कलेक्टर, एसपींकडून दिग्रसचा आढावा
By Admin | Updated: September 13, 2015 02:14 IST2015-09-13T02:14:23+5:302015-09-13T02:14:23+5:30
येथील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी होती.

कलेक्टर, एसपींकडून दिग्रसचा आढावा
दिग्रस : येथील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी होती.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे आदी अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात ते सांगता या मार्गाची पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती जाणून घेतली. यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, मुख्याधिकारी एस.एस. टाले, तलाठी नारायण हागोने यांच्यासह तालुक्याचे प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)