शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत होतेय चक्क पेट्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र   कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगार कार्यालयाकडून नोंदणीपात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात येतो. जिल्ह्यातील कामगारांना लोखंडी पेटीमध्ये अशा साहित्याचा वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुका असल्याने हे साहित्य वाटप थांबवावे, अशा सूचना  आहेत. यानंतरही कंत्राटदाराने पेटी वाटप  सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे पेटी वाटताना पैसे मागितल्या जात असल्याचा आरोप असून, यासाठी दलालही सक्रिय आहेत. कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र   कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. दोन वर्षांपूर्वी कामगारांना पेट्या वाटप करताना गैरप्रकार झाला होता. यामुळे कंत्राटदाराने हे केंद्रच शहराबाहेर हलविले आहे. आता येथेही  दलालामार्फत पैसे मागितले जात असल्याचा आरोप मजूर करीत आहेत. मुळात ही पेटी योजनेमधून मोफत दिल्या जाते. मात्र  मजुरांकडूनच पैसे उकळले जात आहे. पेटी मिळविण्यासाठी मजुरांचे जथ्थे विशेष वाहनाने शहराकडे येत आहेत.   आचारसंहितेत पेटी वाटप करणे हा गुन्हा आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे या काळात पेटी वाटप करताना आचारसंहितेचा भंग करू नका असे पत्र जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. मात्र यानंतरही मंगळवारी लोहारातील केंद्रावरून पेटीचे वाटप करण्यात आले. यामुळे आचारसंहितेचा आदेश पायदळी तुडविल्याचे चित्र आहे. 

कामगार विभाग कारवाई करेल काय ?

- पेटी वाटपाची जबाबदारी ज्या कंत्राटदारांकडे आहे, त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे.  पैसे मागणीचाही आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची सर्व जबाबदारी कामगार विभागावर  आली आहे. या प्रकरणात कामगार विभाग आता काय कारवाई करतोयाकडे मजुरांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतीच्या सार्वत्रिक  आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांमुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे कामगारांमध्ये वाटप करताना आचारसंहितेच्या नियमांचा भंग होणार नाही, नियमांचे काटेकोर पालन होईल, या संदर्भातील निर्देश सुरक्षा किट वाटप करणाऱ्या कंत्राटदारांना दिले आहे. इतकेच नव्हे तर नियमाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असेही सांगितले आहे.  वाटप होत असल्यास ही बाब गंभीर आहे.                

- चांगदेव काशिदजिल्हा कामगार अधिकारी