कोम्बिंग आॅपरेशनसाठी एसपी उतरले रस्त्यावर

By Admin | Updated: June 21, 2015 00:14 IST2015-06-21T00:14:48+5:302015-06-21T00:14:48+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांच्या नेतृत्वात रात्री १ ते पहाटे ५ पर्यंत कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले.

For the COBBING operation, SP landed on the road | कोम्बिंग आॅपरेशनसाठी एसपी उतरले रस्त्यावर

कोम्बिंग आॅपरेशनसाठी एसपी उतरले रस्त्यावर

साडेचारशे पोलीस : ५८ आरोपींना अटक
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांच्या नेतृत्वात रात्री १ ते पहाटे ५ पर्यंत कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. स्वत: एसपी रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून नाईट पेट्रोलिंग करीत होती.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. त्यात ५६ पोलीस अधिकारी व ३९३ पोलीस कर्मचारी अशी साडेचारशे पोलिसांची फौज सहभागी झाली होती. एसपी सिंह यांनी स्वत: यवतमाळ शहर, कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग आॅपरेशनमध्ये भाग घेतला. ४० ते ५० किलोमीटर क्षेत्रात त्यांनी स्वत: गस्त घातली. या आॅपरेशनमध्ये ७१२ वाहनांची तपासणी करण्यात आली. ८४ ढाबे, हॉटेल, लॉज तपासले गेले. पोलीस रेकॉर्डवरील ५९ निगराणी बदमाश घरी आहेत की नाही याची शहानिशा केली गेली. नऊ माहीतगार गुन्हेगारांना तपासण्यात आले. नेहमी गुन्हा केल्यानंतर विशिष्ट ठिकाणी गुन्हेगार आश्रय घेतात. त्यांची जिल्ह्यातील ही नऊ आश्रयस्थाने तपासली गेली. पोलीस दप्तरी फरार असलेल्या यादीतील २९ आरोपी तसेच चार संशयितांना तपासण्यात आले.
न्यायालयातून निघणाऱ्या जमानती, गैरजमानती वॉरंटची अंमलबजावणी होत नाही म्हणून विधी क्षेत्रातून नेहमीच ओरड ऐकायला मिळते. म्हणून एकाच रात्री गैरजमानती वॉरंटवरील ५१ आरोपींना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
याशिवाय संशयावरून सात जणांना ताब्यात घेण्यात आले. या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: For the COBBING operation, SP landed on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.