रविवारी पेट्रोल पंप बंद

By Admin | Updated: May 12, 2017 00:29 IST2017-05-12T00:29:12+5:302017-05-12T00:29:12+5:30

सरकारमान्य तेल कंपन्यांनी अपूर्व चंद्रा समिती (२०११) च्या अहवालाची अंमलबजावणी न केल्याने आणि ४ नोव्हेंबर २०१६ चा करार

Closed petrol pump on Sunday | रविवारी पेट्रोल पंप बंद

रविवारी पेट्रोल पंप बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सरकारमान्य तेल कंपन्यांनी अपूर्व चंद्रा समिती (२०११) च्या अहवालाची अंमलबजावणी न केल्याने आणि ४ नोव्हेंबर २०१६ चा करार न पाळल्याने पेट्रोलपंप चालक फेडरेशनने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आता दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्यासह १५ मेपासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला यवतमाळ जिल्हा पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला आहे.
चंद्रा समितीची अंमलबजावणी न झाल्याने ५ नोव्हेंबरपासून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यात प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार व रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ९ मार्च रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत तेल कंपन्यांनी पुन्हा दोन महिन्यांची मुदत मागितली होती. ९ मे रोजी ही मुदत संपली. या पार्श्वभूमीवर कुरूक्षेत्र (हरियाणा) येथे झालेल्या बैठकीत रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्यासह १५ मेपासून सकाळी ९ ते ६ या वेळात पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Closed petrol pump on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.