उमरखेड शहरातील पुतळ्यांची साफसफाई

By Admin | Updated: February 21, 2016 02:02 IST2016-02-21T02:02:50+5:302016-02-21T02:02:50+5:30

शिवजयंतीच्या निमित्ताने शहीद स्तंभ, पुतळे आणि फलकांची साफसफाई करण्यात आली.

Cleansing statues of Umarkhed City | उमरखेड शहरातील पुतळ्यांची साफसफाई

उमरखेड शहरातील पुतळ्यांची साफसफाई

उमरखेड : शिवजयंतीच्या निमित्ताने शहीद स्तंभ, पुतळे आणि फलकांची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमासाठी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाने पुढाकार घेतला. शहीद स्तंभासह महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जेठमलजी माहेश्वरी, नारायणराव पाटील यांच्या पुतळ्यांची सफाई करून हार अर्पण करण्यात आला.
महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित साफसफाई करण्यात यावी, या हेतूने हा उपक्रम १९ फेब्रुवारीला राबविण्यात आला. शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला हार अर्पण करण्यात आला. वसंतराव नाईक चौकात त्यांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यात आले. महापुरुषांचे केवळ पुतळे उभारण्यापेक्षा त्या पुतळ्यांची नियमित निगा राखून त्यापासून सतत प्रेरणा घेत राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष वंसतराव देशमुख, सचिव राजू गायकवाड, अविनाश खंदारे, विशाल माने, दत्ता काळे, लक्ष्मीकांत नंदनवार, अशोक गांजेगावकर, व्यंकटेश पेन्शनवार, सलमान अशहर खान, महेश काळेश्वरकर, अविनाश मुघटवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cleansing statues of Umarkhed City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.