स्वच्छता सर्व्हेसाठी चमू यवतमाळात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:06 IST2018-02-26T21:06:42+5:302018-02-26T21:06:42+5:30
शहराचा अमृत शहर योजनेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत टिकण्याकरिता नगरपरिषदेने काही महिन्यांपासून तयारी केली.

स्वच्छता सर्व्हेसाठी चमू यवतमाळात दाखल
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शहराचा अमृत शहर योजनेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत टिकण्याकरिता नगरपरिषदेने काही महिन्यांपासून तयारी केली. दिल्ली येथील स्वच्छता चमू प्रत्यक्ष पाहणीसाठी सोमवारी यवतमाळ पालिकेत दाखल झाली. या चमूच्या चार सदस्यांनी संपूर्ण दिवसभर आरोग्य विभागातील दस्ताऐवजांची पाहणी केली. स्वच्छतेच्या संदर्भात राबविण्यात येणाºया उपक्रमांची कागदोपत्री तपासणी झाली.
स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्त समितीचे प्रमुख मुकुंद पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे गौरव कुमार, स्वच्छता मिशनचे राज्य समन्वयक सुहास चव्हाण, शहर समन्वयक ओंकार शवचे यांचा या पथकात समावेश आहे. सकाळी ही चमू नगरपरिषद कार्यालयात पोहोचली. या चमूचे नगराध्यक्ष कांचन चौधरी, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी स्वागत केले. हे पथक तीन दिवस यवतमाळात मुक्कामी आहे. या पथकाने पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील संपूर्ण कागदपत्रांची पाहणी केली. कुठली योजना कशा पद्धतीने राबविल्या जाते याचा कार्यालयीन पद्धतीने आढावा घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत या चमूकडून पडताळणी सुरू होती.
मंगळवारी दुपाºया दिवशी ही चमू प्रत्यक्ष शहरात फिरून स्वच्छता निरीक्षण करणार आहे. यात शौचालयांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन, कचºयाचे विलगीकरण, ओल्या कचºयावर केली जाणारी प्रक्रिया याची पाहणी करणार आहे. अमृत योजनेसाठी पात्र ठरण्याकरिता तब्बल शंभर निकष आहेत. या निकषात पूर्णपणे बसणाºया शहराची निवड होणार आहे. त्या दृष्टिकोनातून नगरपरिषद प्रशासनाने तयारी केली आहे. आता या चमूचा अहवाल काय जातो यावरच योजनेच्या लाभाचे भवितव्य अवलंबून आहे.