शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये कारागृहात गुन्हेगारी टोळ्यांमध्ये हाणामारी

By सुरेंद्र राऊत | Updated: March 14, 2023 19:24 IST

यवतमाळ येथील कारागृहात गुन्हेगारी टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. 

यवतमाळ: येथील जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत. त्यामुळे नियोजन करताना कसरत होते. सध्या पाटीपुरा परिसरातील टोळी व बगीराची टोळी कारागृहात आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये सोमवारी दुपारी १२ वाजता हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

खुनाच्या आरोपात राहुल ऊर्फ शिनू संजय शिंदे, प्रणय राजू मेश्राम, प्रसन्ना प्रमोद मेश्राम, देवानंद प्रल्हाद कलोते, रोशन पुरुषोत्तम प्रधान हे कारागृहात आहे. तर आशिष ऊर्फ बगीरा रमेश दांडेकर, सतीश सुरेश जमदाडे, मंगेश गुणवंत पांडे, पीयूष तुळशीदास देवपारे हे खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. मागील काही दिवसांपासून या दोन्ही टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू होती. सोमवारी दुपारी या दोन्ही टोळ्यातील सदस्यांनी एकमेकांंवर हल्ला चढविला. मारहाण केली. 

हा प्रकार लक्षात येताच कारागृहातील शिपायांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. या हाणामारीत दोन्ही गटांतील एक-एक जण जखमी झाला आहे. सतीश सुरेश जमदाडे याच्या ओठाला दुखापत झाली, तर राहुल ऊर्फ शिनू संजय शिंदे याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांनी कारागृहातील घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी शिपाई सचिन भुते यांच्या तक्रारीवरून दोन्ही गटांतील सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :YavatmalयवतमाळjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी