पुसद शहरात कोरोना विषाणूने केला कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:08+5:30
पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन येथील खासगी रुग्णालयात अर्धांगवायूवरील उपचारासाठी दाखल झाले होते. नंतर त्यांना वर्धा येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर वर्धा येथेच गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या घटनेत मोतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

पुसद शहरात कोरोना विषाणूने केला कहर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात कोरोनाने कहर केला आहे. गुरुवारी एकाच दिवसी दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत चारने भर पडली. त्यामुळे तालुक्याची अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३५ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधितांची संख्या ५२ वर पोहोचली. यापैकी आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन येथील खासगी रुग्णालयात अर्धांगवायूवरील उपचारासाठी दाखल झाले होते. नंतर त्यांना वर्धा येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर वर्धा येथेच गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या घटनेत मोतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. तीन दिवसांपूर्वीच त्यांना यवतमाळ येथे दाखल करण्यात आले होते. यापूर्वी १४ जूनला गढी वॉर्डातील ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. कोरोनाने आतापर्यंत तिघांचे बळी घेतले आहे.
तालुक्यात सध्या कोरोना अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. एकूण बाधितांची संख्या ५२ झाली आहे. शहरातील चार परिसर सील करण्यात आले. जवळपास १०० नागरिक क्वारंटाईन आहे. या सर्वांचे स्वॅब शुक्रवारी तपासणीसाठी यवतमाळला पाठविल्याचे नोडल आॅफिसर डॉ.हरीभाऊ फुपाटे यांनी सांगितले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये - एसडीओ
शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. उर्वरित वेळात संचारबंदी लागू आहे. सर्वांनी या संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.