पुसद शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:27+5:30

शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

The city and taluka of Pusad became the hotspot of Corona | पुसद शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

पुसद शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या पोहोचली ३१ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला. रविवारी एकाच दिवशी तब्बल ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोमवारी त्यात आणखी दोन पॉझिटिव्हची भर पडली. त्यामुळे पुसद शहर व तालुका कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनल्याचे दिसून येत आहे.
शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी रामनगरमधील ३५ वर्षीय व्यापारी व संभाजीनगर येथील एका खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३० वर्षीय परिचारिकेचा कोरोना अहवाल रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५ झाली आहे. त्यापैकी १३ जणांनी कोरोनावर मात केली. तर एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.
शहरात सध्या गढी वॉर्ड, अरुण ले-आऊट, पार्वतीनगर आणि रहेमतनगर हे चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. येथील आयुर्वेद महाविद्यालाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये रविवारी रॅपिड टेस्ट केलेल्या २९ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
त्यांना सुटी देण्यात आल्याचे नोडल आॅफिसर डॉ.हरीभाऊ फुपाटे यांनी सांगितले. आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या ५२ पैकी ४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी दिल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. या सेंटरमधील एकाचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. सदर नागरिक बीआरसीचा क्लार्क आहे.

प्रशासन दक्ष नागरिक मात्र बिनधास्तच
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळल्यास स्वत:हून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी केले. तसेच नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने रॅपिड टेस्ट तपासणी करण्याचेही आवाहन केले.

Web Title: The city and taluka of Pusad became the hotspot of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.