‘मेडिकल’च्या ५० जागांवर गंडांतर

By Admin | Updated: April 18, 2015 02:10 IST2015-04-18T02:10:08+5:302015-04-18T02:10:08+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या वाढीव ५० जागांवर गंडांतर येण्याची शक्यता

Circulation of 50 seats in 'Medical' | ‘मेडिकल’च्या ५० जागांवर गंडांतर

‘मेडिकल’च्या ५० जागांवर गंडांतर

सुरेंद्र राऊत यवतमाळ
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या वाढीव ५० जागांवर गंडांतर येण्याची शक्यता असून भारतीय आयुर्विज्ञान परिषद (एमसीआय)च्या निर्देशाप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात महाविद्यालयाला अपयशी ठरले. आता एमसीआयने या जागा कायम ठेवण्यासाठी शेवटची संधी दिली असून उणिवा पूर्ण करण्यासाठीच धडपड सुरू आहे.
एमसीआयच्या पथकाने सप्टेंबर महिन्यात ‘मेडिकल’ची तपासणी केली होती. त्यात १४.९७ टक्के शिक्षकांची पदे रिक्त आढळून आली. प्रत्यक्षात रजेवर असलेल्या शिक्षकांच्या जागाही पथकाने रिक्त दाखविल्या. तर १५ टक्के निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त दाखविण्यात आली. शल्यचिकित्सा विभागात १२० खाटांची आवश्यकता असताना केवळ ९६ खाटाच आढळून आल्या. बाह्यरुग्ण तपासणीचा आकडाही कमी दाखविला. दर दिवशी किमान १००० रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विकृतीशास्त्र विभागामध्ये हिस्ट्रो पॅथॉलॉजी रिपोर्ट होत नाही, अपघात कक्षात स्त्रीरोग तपासणीची व्यवस्था नाही, आॅपरेशन थेटरमधील प्री आॅपरेटिव्ह खाटांची व्यवस्था नाही. अतिदक्षता कक्षामध्ये आणखी पाच बेड हवे आहेत. फॉर्मोकोलॉजी व्हिजीलन्स कमिटी येथे अस्तित्वात नाही. या कमिटीने घेतलेल्या बैठकांचे मिनिटस एमसीआय चमूपुढे सादर करण्यात आले नाही. १६० आसन क्षमतेचे दोनच अध्यापन कक्ष असल्याचीही त्रुटी काढण्यात आली आहे. ब्लड कम्पोनंट युनीट नसल्याची सर्वात मोठी त्रुटी काढण्यात आली आहे. यामुळे अनेक विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली नाही. या त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन धडपड करत आहे. अन्यथा ५० जागा कमी होण्याची नामुष्की ओढविणार आहे.

Web Title: Circulation of 50 seats in 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.