कारागृहातून सुटणाऱ्यांवर ‘सीआयडी’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:13 IST2017-12-10T01:13:44+5:302017-12-10T01:13:57+5:30

जिल्हा कारागृहातून दररोज बाहेर पडणाऱ्या मालमत्तेच्या प्रकरणातील गुन्हेगारांवर सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग)चा वॉच राहतो. अशा सुटणाºयांची यादी थेट सीआयडीच्या पुणे मुख्यालयात महासंचालकांकडे पाठविली जाते.

CID Watch on those who escape from prison | कारागृहातून सुटणाऱ्यांवर ‘सीआयडी’चा वॉच

कारागृहातून सुटणाऱ्यांवर ‘सीआयडी’चा वॉच

ठळक मुद्देथेट पुण्यात अहवाल : एसपींना मिळतात सतर्कतेच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा कारागृहातून दररोज बाहेर पडणाऱ्या मालमत्तेच्या प्रकरणातील गुन्हेगारांवर सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग)चा वॉच राहतो. अशा सुटणाऱ्यांची यादी थेट सीआयडीच्या पुणे मुख्यालयात महासंचालकांकडे पाठविली जाते.
दरोडा, जबरी चोरी या सारखे गंभीर गुन्हे घडले असेल तर तेथे भेट देणे सीआयडीला बंधनकारक आहे. अलिकडे या भेटींचे अहवाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कागदपत्रांवरूनच पुण्याला जात असल्याचे सांगितले जाते. पुणे मुख्यालयाकडूनही या प्रत्यक्ष भेटींचा फार आग्रह धरला जात नाही.
त्यामुळे सीआयडीच्या यंत्रणेत अशा गुन्ह्यांबाबत बरीच शिथीलता आल्याचे चित्र पहायला मिळते. कारागृहातून सुटणाºया (जेल रिलीज) दरोडा, जबरी चोरी अशा गुन्ह्यातील आरोपींवर मात्र सीआयडीचा वॉच राहतो. अशा आरोपींची यादी दररोज सीआयडीच्या पुण्यातील महासंचालक कार्यालयाला पाठविली जाते. महासंचालक तपासणी करून अशा गुन्हेगारांची यादी आवश्यकतेनुसार संबंधित जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवितात. त्यात कारागृहातून सुटलेल्या या गुन्हेगाराच्या हालचालींवर नियमित वॉच ठेवण्याचे निर्देश दिले जातात.
सदर गुन्हेगार अन्य शहरात पळून गेला का, उपजीविकेसाठी नेमके काय काम करतो, त्याची कोणाशी उठबस आहे, त्याची दिनचर्या काय, अशा विविध पैलूंनी त्याच्यावर सीआयडीच्या आदेशावरून पोलीस यंत्रणा वॉच ठेवते. त्याने पुन्हा कोणत्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये, या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न असतात.

Web Title: CID Watch on those who escape from prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.