सूत गिरणीच्या एका जागेसाठी चुरस

By Admin | Updated: June 16, 2016 02:56 IST2016-06-16T02:56:28+5:302016-06-16T02:56:28+5:30

तालुक्यातील पिंपळगाव येथील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या एका जागेसाठी निवडणूक होऊ घातली आहे.

Churning for a place in the cotton mill | सूत गिरणीच्या एका जागेसाठी चुरस

सूत गिरणीच्या एका जागेसाठी चुरस

२० संचालक अविरोध : बाबासाहेब नाईक सूत गिरणी निवडणूक
महागाव : तालुक्यातील पिंपळगाव येथील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या एका जागेसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीने तालुक्याचे राजकारण ढवळून निघत असून पूर्वीचे दुखावलेले संचालक आणि विरोधी गट एकवटल्याने चुरस वाढली आहे. यापूर्वी नाईक पॅनचे २० संचालक अविरोध आले आहेत.
सूत गिरणीची निवडणूक अविरोध झाली असती तर गिरणीतील अंतर्गत अनियमितता बाहेर आली नसती. राखीव जागा असल्यामुळे फारसे कोणी लक्ष देणार नाही, या भावनेतून सत्ताधारी गटाने दुर्लक्ष केले. मात्र पुसद तालुका भाजपा अध्यक्ष विश्वास भवरे रिंगणात उतरले. त्यांच्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, विनोद जिल्हेवार परिश्रम घेत आहेत. सूत गिरणीच्या माध्यमातून भाजपा आपली सहकारातील ताकद आजमावून पाहात आहे. सूत गिरणीत पराभव झाला तरी भाजपाचा चेहरा म्हणून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नाईकांच्या मोहऱ्याविरुद्ध लढण्यासाठी भवरे यांची रंगीत तालीम सुरू आहे.
पुसदमधील नेते पक्ष मतभेद बाजूला सारून विश्वास भवरेच्या प्रचारात गुंतल्याचे चित्र आहे. सूत गिरणीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपाचा हा प्रयत्न आहे. कापूस उत्पादकांच्या भरोशावर उभी राहिलेल्या सहकारी संस्थेत कापूस उत्पादक वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.
गिरणीत खरेदी विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता राहिली नाही, असा जाहीर आरोप भाजपने केला आहे. सुरुवातीला सहज वाटणारी ही निवडणूक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता कुठे मनावर घेतली आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होवू लागल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे. सर्वत्र निवडणुकीची चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Churning for a place in the cotton mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.