बँक कर्मचाऱ्याला चोप

By Admin | Updated: July 15, 2015 03:00 IST2015-07-15T03:00:33+5:302015-07-15T03:00:33+5:30

वारंवार विनंती करूनही कर्ज पुनर्गठणास टाळाटाळ करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला एका शेतकऱ्याने चांगलाच चोप

Chuck the bank employee | बँक कर्मचाऱ्याला चोप

बँक कर्मचाऱ्याला चोप

मुडाणाची घटना : कर्ज पुनर्गठणास टाळाटाळ केल्याने शेतकरी संतप्त
बिजोरा : वारंवार विनंती करूनही कर्ज पुनर्गठणास टाळाटाळ करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला एका शेतकऱ्याने चांगलाच चोप दिल्याची घटना महागाव तालुक्यातील मुडाणा येथील युनियन बँकेत मंगळवारी दुपारी १.४५ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
साधूनगर येथील शेतकरी शंकर शामराव जाधव यांचे मुडाणा येथील युनियन बँकेत खाते आहे. गत २० दिवसांपासून कर्ज पुनर्गठणासाठी ते मुडाणा येथील बँकेत जात होते. आवश्यक कागदपत्रांचीही त्यांनी पूर्तता केली होती. दरम्यान बुधवारी दुपारी ते कर्ज पुनर्गठणाची चौकशी करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी शिवाजी खंडू डाखोर यांना याबाबत विचारणा केली. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावरून शाब्दीक वाद सुरू झाला. काही कळायच्या आत शंकरने बँक कर्मचारी शिवाजीला चांगलाच चोप दिला. या घटनेने बँकेत खळबळ उडाली. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शेतकऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान शेतकरी शंकर जाधव यांना विचारणा केली असता शिवाजी डाखोर यांनी कर्ज पुनर्गठणासाठी ५०० रुपयाची मागणी केली. गत २० दिवसांपासून बँकेत येरझारा मारून थकलो. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगतिले. परंतु शेतकऱ्याने पोलिसात मात्र तक्रार दिली नव्हती. मुडाणा बँकेत दलालांचा सुळसुळाट झाला असून शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे रखडल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Chuck the bank employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.