यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:04 IST2017-12-24T22:04:18+5:302017-12-24T22:04:31+5:30
ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. सहावी ते दहावीचे विद्यार्थी यामध्ये उत्साहात सहभागी झाले होते. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सांताक्लॉज बनलेला सहावीचा विद्यार्थी कैवल्य राऊत हा राहिला.

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. सहावी ते दहावीचे विद्यार्थी यामध्ये उत्साहात सहभागी झाले होते. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सांताक्लॉज बनलेला सहावीचा विद्यार्थी कैवल्य राऊत हा राहिला.
सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘झिंगल बेल’ या गीतावर नृत्य सादर केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनीही नृत्य सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. रूचल राऊत आणि निधी जाधव यांनी येशूच्या जन्माची गोष्ट सांगितली. नृत्यासाठी विद्यार्थ्यांना स्नेहा पंधरे यांचे मार्गदर्शन लाभले.
संगीत शिक्षक विशाल शेंदरकर व सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात आठवीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार नववीच्या विद्यार्थिनी मैथिली बोंपीलवार व अंकिता घोरसडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सीसीई प्रमुख अमोल चन्नुरवार, अभिजित भिष्म, उमाकांत रोडे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा व प्राचार्य जेकब दास यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.