चोरट्या दारूतून बुडतोय लाखोंचा महसूल

By Admin | Updated: October 29, 2014 22:55 IST2014-10-29T22:55:56+5:302014-10-29T22:55:56+5:30

प्रमुख शहरांमध्ये अधिकृत कारखान्यात दारूची निर्मिती केली जाते. ही दारू चोरट्या (कर बुडवून) मार्गाने कारखान्याबाहेर काढली जाते. तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून

Choratya Pirutu Budoutoy Revenue Revenue | चोरट्या दारूतून बुडतोय लाखोंचा महसूल

चोरट्या दारूतून बुडतोय लाखोंचा महसूल

यवतमाळ : प्रमुख शहरांमध्ये अधिकृत कारखान्यात दारूची निर्मिती केली जाते. ही दारू चोरट्या (कर बुडवून) मार्गाने कारखान्याबाहेर काढली जाते. तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून या दारूची विक्री होते. जिल्ह्यात ही चोरटी दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असून त्यातून शासनाचा लाखो रुपये महसूल महिन्याकाठी बुडतो. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मांगुळ येथे देशी दारू निर्मितीचा केवळ एक कारखाना आहे. तेथे दारूची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने परजिल्ह्यातील परवानाकृत कारखान्यात तयार झालेली देशी दारू जिल्ह्यात येते. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आदी ठिकाणाहून ही दारू आयात केली जाते. विदेशी दारू नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक आदी जिल्ह्यातून आणली जाते. उत्पादन शुल्क कर भरल्याशिवाय दारू बाहेरच पडू शकत नाही. मात्र कारखान्यातील उत्पादन शुल्क अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरट्या मार्गाने दारू बाहेर काढली जाते. परवानाकृत वाईन शॉप आणि बारमध्ये अथवा देशी दारू चिल्लर विक्रीच्या दुकानात तपासणीदरम्यान ती आढळल्यास अनुज्ञाप्तीधारकावर कारवाई होते. त्यामुळे कुणीच चोरटी दारू विकण्याचा धोका पत्करत नाही. त्यामुळे ही दारू थेट गुत्यांवरून विकली जाते. प्रत्येकच ठाण्याला महिन्याकाठी अवैध दारू पकडण्याचे टार्गेट दिले जाते. वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी पोलिसांकडून हे टार्गेट पूर्ण केले जाते. त्यानंतर ही दारू बनावट आहे किंवा नाही, दारूचे उत्पादन शुल्क भरले आहे किंवा नाही, अवैध विक्रेत्याने ही दारू कुठून खरेदी केली हे जाणून घेण्यासाठी पॅकिंगवरील लॉट क्रमांकाचा दारूसाठा कुठल्या विक्रेत्याला कारखान्यातून देण्यात आला आदी बाबीचा अहवाल ते उत्पादन शुल्क कार्यालयाकडून मागवितात. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतरही हा अहवाल प्राप्त होत नाही. त्यातूनच मोठ्या प्रमाणात चोरट्या दारूची विक्री होत आहे. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नवलकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Choratya Pirutu Budoutoy Revenue Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.