घाटंजीतील चिंचोलीच्या मांत्रिकाला पाच वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:02+5:30
सुनील हुसेन मेश्राम (२५), रा.चिंचोली ता.घाटंजी असे शिक्षा झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. त्याने सतत आजारी राहात असलेल्या अल्पवयीन मुलीवर पूजापाठ करून तुझी प्रकृती सुधारतो असा दावा केला. तिला घरी बोलावून तिच्या डोळ्यात लिंबू पिळले व नंतर उतारा काढण्यासाठी निर्जनस्थळी गावाबाहेर घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला.

घाटंजीतील चिंचोलीच्या मांत्रिकाला पाच वर्षे शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुलीची प्रकृती चांगली राहात नसल्याने कुटुंबीयांनी तिला एका मांत्रिकाकडे नेले. त्या मांत्रिकाने लिंबाचा उतारा काढण्यासाठी निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वर्ष कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.
सुनील हुसेन मेश्राम (२५), रा.चिंचोली ता.घाटंजी असे शिक्षा झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. त्याने सतत आजारी राहात असलेल्या अल्पवयीन मुलीवर पूजापाठ करून तुझी प्रकृती सुधारतो असा दावा केला. तिला घरी बोलावून तिच्या डोळ्यात लिंबू पिळले व नंतर उतारा काढण्यासाठी निर्जनस्थळी गावाबाहेर घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला.
मुलीने घरी परतल्यानंतर कुटुंबियांना घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलाने पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मांत्रिकाविरूद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
घाटंजीचे तत्कालीन ठाणेदार गणेश भावसार यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा न्यायाधीश एम. मोहिउद्दीन एम.ए. यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. त्यानुसार आरोपीला पाच वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सहायक सरकारी वकील अॅड. नरेंद्र एन. पांडे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून अनिल राजगडकर यांनी त्यांना सहकार्य केले.