शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

चायना फवारणी पंप यवतमाळच्या बाजारातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 11:30 PM

यवतमाळच्या बाजारपेठेतून शेतीमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे स्प्रे पंप अचानक गायब झाले आहे. दुसरे पंप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्यासुटे भागही मिळत नसल्याने फवारणी यंत्र भंगारात

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चायना वस्तूंवर देशभर बहिष्काराचे वातावरण असतानाच यवतमाळच्या बाजारपेठेतून शेतीमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे स्प्रे पंप अचानक गायब झाले आहे. दुसरे पंप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.बहुप्रतीक्षेनंतर बरसलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे शेत शिवारात तणही वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशक खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. बाजारात तणनाशकच उपलब्ध नाही. फवारणीसाठी लागणारे स्प्रेपंप बाजारातून गायब झाले आहे. पूर्वी चायना हे पंप बनवत होते. याला पर्याय म्हणून असलेल्या भारतीय कंपन्या स्पर्धेत नव्हत्या. परिणामी बाजारात पंपाचाही तुटवडा पाहायला मिळत आहे.

खुल्या बाजारावर चायना स्प्रे-पंपने मार्केट काबिज केले. विक्रेत्यांनी हे चायना स्प्रे-पंप बाजारात आणले. जुन्या स्टॉकवरून या साहित्याची प्रारंभी विक्री झाली. आता या स्प्रे-पंपाचे स्पेअरपार्ट येण्याची प्रक्रिया थांबली आहे. याला पर्याय म्हणून असणारे भारतीय पंप मोजकेच आहेत. या पंपाचे साहित्य बाजारात उपलब्ध नाही. यामुळे बाजारात स्प्रे-पंपाचा तुटवडा निर्माण झाला आहे.स्प्रे-पंपाची बॅटरी वर्षभरात खराब होते. चायना पंपाच्या बॅटरीचा स्टॉक संपला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने स्प्रे-पंप खरेदी करावा लागत आहे. असे पंप बाजारात उपलब्ध नाही. यातून शेतकरी धास्तावले आहेत. फवारणीचे पंप मिळविण्यासाठी बाजारात गर्दी वाढली आहे.तणनाशकाचाही तुटवडामजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकºयांनी अलीकडच्या काळात तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे. यावर्षी तणनाशक निर्मिती कंपनीकडे मोजकाच स्टॉक आहे. यातून बाजारात तणनाशकाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकºयांना तणनाशक खरेदी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती