चौसाळाशिवारात डोळ्यात मिरची पूड फेकून लुटले

By Admin | Updated: February 27, 2017 00:48 IST2017-02-27T00:48:59+5:302017-02-27T00:48:59+5:30

चापडोह येथील दुचाकी चालकाला डोळ्यात मिरची फूड फेकून लुटण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी चौसाळा शिवारात घडली.

Chilli shovel chilli powder was thrown in the eye and then looted | चौसाळाशिवारात डोळ्यात मिरची पूड फेकून लुटले

चौसाळाशिवारात डोळ्यात मिरची पूड फेकून लुटले

यवतमाळ : चापडोह येथील दुचाकी चालकाला डोळ्यात मिरची फूड फेकून लुटण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी चौसाळा शिवारात घडली.
चापडोह (पुनर्वसन) येथील रहिवासी पंकज वसंत ढोक हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एम.एच.२९-के.ए.६५९१) यवतमाळ येथून किटाकापराकडे जात होते. कापरा मार्गावर चौसाळा शिवारात अचानक त्यांच्या दुचाकीसमोर दोन अज्ञात व्यक्ती आल्या. त्यांनी काही कळायच्या आत पंकजच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. यामुळे गांगरून गेलेला पंकज डोळे चोळत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी त्याच्या खिशातील रोख २२ हजार रूपये, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड, चालक परवाना आदी हिसकावून घेतले.
यानंतर लगेच ते दोघेही तेथून पसार झाले. पंकजने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात दोघांविरूद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौसाळा शिवारात यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. या शिवारात भरदिवसाही वर्दळ अत्यंत कमी असते. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Chilli shovel chilli powder was thrown in the eye and then looted