‘रोटरी’चे मुख्यमंत्री निधीत एक लाख
By Admin | Updated: February 15, 2015 02:03 IST2015-02-15T02:03:39+5:302015-02-15T02:03:39+5:30
रोटरी क्लब आॅफ यवतमाळने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री निधीला एक लाख ११ हजार १११ रुपये प्रदान केले.

‘रोटरी’चे मुख्यमंत्री निधीत एक लाख
यवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री निधीला एक लाख ११ हजार १११ रुपये प्रदान केले. येथील पोस्टल मैदानात आयोजित ‘रोटरी महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, उद्योजक विशाल बुबन, श्याम अग्रवाल, सुखदेव दुबे, रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, सचिवद्वय राजेश गढीकर, माधवी राजे, प्रकल्प अधिकारी जलालुद्दिन गिलाणी, समन्वये डॉ. राजेंद्र पद्मावार, सतीश फाटक, कन्हैया वाधवानी, सतीश बजाज, अब्बास बॉम्बेवाला आदी उपस्थित होते.
प्रसंगी जिल्हाधिकारी महिवाल म्हणाले, रोटरी इंटरनॅशनलचे संपूर्ण जगात मानवतावादी दृष्टीकोनातून सुरू असलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. या कार्यासाठी प्रशासनाचे नेहमी भरीव सहकार्य राहील.
पोलीस अधीक्षक दराडे यांनीही याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. दीपप्रज्वलनानंतर प्रा. अनंत पांडे, मिलिंद राजे, अविनाश लोखंडे, मनिष कासलीकर, संजय वंजारी, देवीदास गोपलानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात पाच गरजू महिलांना शिवणयंत्राचे वाटप आणि एका अपंग व्यक्तीला तीनचाकी वाहन देण्यात आले. हा महोत्सव १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. याठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहे. यावेळी अशोक कोठारी, विनायक कशाळकर, मिलिंद वेळूकर, मंगेश खुने, अजय म्हैसाळकर, अॅड. किशोर देवानी, आनंद भुसारी, डॉ. जाफर अली जिवाणी, अभिजित दाभाडकर, विजय घाटगे, दिलीप राखे, मुकुल अग्रवाल, अॅड. अजय सावला, अविनाश ओमनवार, अब्दुल बॉम्बेवाला आदी उपस्थित होते. (वार्ताहर)