मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जिल्ह्यात
By Admin | Updated: August 27, 2015 00:03 IST2015-08-27T00:03:26+5:302015-08-27T00:03:26+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प ...

मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जिल्ह्यात
सिंचन आढावा : बेंबळा प्रकल्पाची पाहणी
यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची पाहणी करणार आहे. तसेच जिल्ह्यातील जलसिंचनाचा आढावा घेणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध सिंचन प्रकल्पाला भेटी देत आहे. ७५ टक्के काम पूर्ण झालेले प्रकल्प आगामी तीन वर्षात सिंचनासाठी उपयुक्त ठरावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी ते पाहणी करणार आहे. मुख्यमंत्री बेंबळा प्रकल्पाच्या डेहणी उपसासिंचन योजनेच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राला भेट देतील. त्या ठिकाणी बेंबळा प्रकल्पासह नेर तालुक्यातील कोहळा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेणार आहे. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी, कालवा निर्मितीसाठी भूसंपादन, रखडलेले पुनर्वसन, पुनवर्सित गावांमधील विविध नागरी सुविधा आदींचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. (शहर वार्ताहर)