छत्रपती महोत्सवाचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:07 IST2018-02-17T22:07:02+5:302018-02-17T22:07:28+5:30
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती महोत्सवाचे शुक्रवारी समता मैदानात बाळासाहेब घारफळकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.

छत्रपती महोत्सवाचे थाटात उद्घाटन
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती महोत्सवाचे शुक्रवारी समता मैदानात बाळासाहेब घारफळकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर ख्यातनाम शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या क्रांती जलशाने शिवभक्तांना प्रबोधनाची पर्वणी दिली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी वैशाली सवई, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, डॉ. छाया महाले, विजय खडसे, संगीता घुईखेडकर, दर्शना इंगोले, सिद्धार्थ भवरे, अंकुश वाकडे, डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, राजेंद्र घोंगडे, पप्पू पाटील भोयर, सुशिला भोयर, प्रदीप साळवे, किशोर भगत आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समतावादी राजसत्ता निर्माण केली. आगामी काळात जनतेने शिवाजी महाराजांच्या विचारानुसार वाटचाल करावी, असे यावेळी घारफळकर म्हणाले.
सोहम ब्राह्मणकर व अभिजित तरोडे यांचा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यावर्षीचा संभाजी राजे युवा पुरस्कार हॉकीपटू आकाश चिकटे यांना प्रदान करण्यात आला.
क्रांती जलसा सादर करताना शितल साठे यांनी मॉ जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर क्रांतिगीते सादर केली. सांस्कृतिक संघर्षाची चळवळ आपण अधिक जोमाने लढली पाहिजे, असा संदेश साठे यांनी दिला. नक्षलवादी ठरविल्याने सहा वर्षे तरूंग भागावा लागलेले सचिन माळी यांनी ‘लोकशाही’ कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल कडू यांनी केले. सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले. तर आभार विपीन राऊत यांनी मानले. शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शिवनाट्य पोवाडे स्पर्धा
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील समता मैदानात १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय शिवनाट्य पोवाडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख राहतील. दरम्यान, १८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता बुद्धीबळ स्पर्धा, सकाळी १० वाजता शिवरत्न संगीत सम्राट राज्यस्तरीय गायन स्पर्धा तर सायंकाळी ५ वाजता समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.