आरोपींच्या अटकेसाठी ठाण्यावर धडक
By Admin | Updated: January 12, 2015 22:59 IST2015-01-12T22:59:53+5:302015-01-12T22:59:53+5:30
जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही आर्णी पोलीस आरोपींच्या अटकेस टाळाटाळ करीत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी तालुक्यातील मनपूर येथील

आरोपींच्या अटकेसाठी ठाण्यावर धडक
मनपूरचे प्रकरण : नागरिकांनी विचारला पोलिसांना जाब
आर्णी : जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही आर्णी पोलीस आरोपींच्या अटकेस टाळाटाळ करीत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी तालुक्यातील मनपूर येथील शेकडो महिला व पुरुष सोमवारी आर्णी पोलीस ठाण्यावर धडकले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या अटकेचे आश्वासन दिल्याने नागरिक परत गेले.
मनपूर येथील नंदाबाई पेटारे यांच्या तक्रारीवरून आरोपी राकेश वर्मा, रितेश वर्मा, गणेश भोकरे, नामदेव भोकरे यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आर्णी पोलिसात २ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच १० जानेवारी रोजी राहुल मुनेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामदेव भोकरे, गणेश भोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे मनपूरचे शेकडो नागरिक आर्णी पोलीस ठाण्यात धडकले. आरोपींच्या अटकेची मागणी करू लागले. यावेळी दयानंद बनसोड, लक्ष्मण पाटील, दीपक देवतळे, संजय वाघमारे, एन.डी. गणवीर, जयराज मुनेश्वर, सुनील भगत यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)