‘मॅग्मो’च्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल
By Admin | Updated: May 25, 2015 02:27 IST2015-05-25T02:27:10+5:302015-05-25T02:27:10+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेत दोन गट पडले होते.

‘मॅग्मो’च्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल
यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेत दोन गट पडले होते. गट ‘अ’चे अधिकारी आणि गट ‘ब’चे अधिकारी असा वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच संघटनेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आला असून, मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. धर्मेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.
तालुका वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ दर्जाचाच असावा या वरून हा वाद निर्माण झाला होता. गट ‘ब’ संवर्गाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होेते. त्यानंतर थेट मॅग्मो संघटनेची कार्यकारिणीच बदलविण्याचा पवित्रा गट ‘अ’ च्या अधिकाऱ्यांनी घेतला. यात डॉ. धर्मेश चव्हाण यांची अध्यक्षपदी, डॉ. संजय मुरमुरे सरचिटणीस, डॉ. मधुकर मडावी कार्याध्यक्ष, डॉ. मनोज सत्यपार कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून डॉ. शामकुमार शिंदे, डॉ. सचिन तोडकरी, कार्यकारी अध्यक्ष म्हणून आशिष पवार, चिटणीस पदी डॉ. जब्बार पठाण, राज्य प्रतिनिधी म्हणून डॉ. रवींद्र पांढरे, संजय मडावी, महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. प्रिती लांबकासे, डॉ. शुभांगी आंबाडेकर, कायदेविषयक सल्लागार म्हणून डॉ. प्रकाश चिमणानी, डॉ. स्वप्नील सातपुते, डॉ. संतोष जाधव, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. पी.एस. चव्हाण, डॉ. नवरंगे, डॉ. भोंगाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया राज्य मॅग्मो संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रवीण धमाणे, डॉ. प्रभाकर नाईक, डॉ. विजय आकोलकर यांच्या उपस्थित करण्यात आली. अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)