पोटासाठी बदलला पारंपरिक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:35+5:30

इतर व्यवसाय करणाऱ्यांना आपला व्यवसाय करण्याची मुभा नाही. त्यांच्यावर एकप्रकारचे संकट ओढवले. व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. रोजगार बंद पडल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी आता त्यांना आपला पारंपरिक व्यवसाय बदलवून अत्यावश्यक वस्तू विक्रीचा मार्ग स्वरकारावा लागला आहे.

Changed traditional business for the stomach | पोटासाठी बदलला पारंपरिक व्यवसाय

पोटासाठी बदलला पारंपरिक व्यवसाय

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेच्या वस्तू विक्रीकडे वळले : हॉटेल, भांडी विक्री, भंगार खरेदी सोडली

हमीद खाँ पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोलाबाजार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन सुरू केले आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इतर व्यवसाय करणाऱ्यांना आपला व्यवसाय करण्याची मुभा नाही. त्यांच्यावर एकप्रकारचे संकट ओढवले. व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. रोजगार बंद पडल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी आता त्यांना आपला पारंपरिक व्यवसाय बदलवून अत्यावश्यक वस्तू विक्रीचा मार्ग स्वरकारावा लागला आहे.
लॉकडाऊनमध्ये शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहे. त्यामध्ये किराणा, भाजीपाला, दूध, अंडी , मांस, दवाखाना, मेडिकल व पेट्रोलपंप या व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू ठेवण्याची सूट देण्यात आली. परंतु इतर व्यवसाय करणाºया दुकानदारांवर संचारबंदी काळात इतके दिवस आपला व्यवसाय बंद करायची वेळ आली. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. यापैकी अनेकांचे, हातावर पोट भरणारांचे जगण्याचे वांदे झाले. त्यांच्या घरची चूल पेटण्याची समस्या निर्माण झाली. १४ एप्रिलपयर्यंत घरी बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. आता त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी आपला वडिलोपार्जीत शेवचिवडा, भांडेविक्री, भंगार खरेदी, पान, थंडपेय, बर्फगोला विक्रीचा व्यवसाय बाजूला ठेवून अत्यावश्यक सेवेत मोडणारा भाजीपाला, किराणा वस्तू, टरबुज, फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हा रोजगाराचा नवीन मार्ग निवडून आपल्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न या गरीब व्यावसायिकांकडून होताना दिसत आहे.

Web Title: Changed traditional business for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.