बाभूळगाव येथे भरबाजारात पत्नीवर चाकूहल्ला

By Admin | Updated: June 30, 2017 02:01 IST2017-06-30T02:01:29+5:302017-06-30T02:01:29+5:30

येथील आठवडीबाजारात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

Chakahala on wife's wife in Babhulgaon | बाभूळगाव येथे भरबाजारात पत्नीवर चाकूहल्ला

बाभूळगाव येथे भरबाजारात पत्नीवर चाकूहल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : येथील आठवडीबाजारात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वर्षा लक्ष्मण बनसोड (३५) हल्ली मु.गणोरी असे जखमी पत्नीचे नाव आहे. पतीच्या संशयीवृत्तीमुळे ती पाच-सहा वर्षांपासून माहेरी गणोरी येथे राहत होती. तिचा पती लक्ष्मण बनसोड (४०) हा कळंब तालुक्यातील नरसापूर येथे राहतो. शुक्रवारी वर्षा माहेरवरून बाभूळगाव येथे आठवडीबाजारासाठी आली. आठवडीबाजारात पालेभाजी खरेदी करीत असताना अचानक तिचा पती लक्ष्मण आला. त्याने पिशवीतील पेट्रोलची डबकी तिच्या अंगावर ओतली आणि चाकूने पोटावर व छातीवर वार केले. तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. तसेच पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Chakahala on wife's wife in Babhulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.