मेव्हण्याचा जावयावर चाकूहल्ला

By Admin | Updated: May 1, 2017 00:12 IST2017-05-01T00:12:12+5:302017-05-01T00:12:12+5:30

तालुक्यातील भारी येथील शेत शिवारात मेव्हण्याने जावयावर चाकूने हल्ला केला. त्याने थेट छातीवरच चाकूचा घाव घातला.

Chakahala on the gooseberry | मेव्हण्याचा जावयावर चाकूहल्ला

मेव्हण्याचा जावयावर चाकूहल्ला

पैशाचा वाद : भारी शिवारातील घटना, पोलिसांत तक्रार दाखल
यवतमाळ : तालुक्यातील भारी येथील शेत शिवारात मेव्हण्याने जावयावर चाकूने हल्ला केला. त्याने थेट छातीवरच चाकूचा घाव घातला. ही घटना रविवारी दुपारी घडली.
वासुदेव खडसे (४५) रा. चाणी कामठवाडा, असे जखमी जावयाचे नाव आहे. वासुदेव खडसे हे पत्नीसह भारी येथील प्रकाश ढेकळे यांच्या शेतात राहतात. रविवारी दुपारी लिलीच्या फुलांचे गठ्ठे बांधत असताना त्यांचा मेव्हणा कैलास राघो गाडेकर (४०) तेथे धडकला. त्याने पैशासाठी तगादा लावला. यावरून मेव्हणा व जावयात वाद झाला. कैलासने जीवाने मारण्याची धमकी दिली. याला भिक घालणार नाही, असे उत्तर वासुदेवने दिले. त्यामुळे संतापलेल्या कैलासने घरातून चाकू आणून वासुदेवच्या छातीवर वार केला. क्षणार्धात तो जमिनीवर कोसळला. त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्रकाश ढेकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Chakahala on the gooseberry