बुढीचा चिवडा; चवदार चिवड्यातून यवतमाळचा जागतिक लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:35 IST2018-03-08T12:35:33+5:302018-03-08T12:35:41+5:30

बुढीचा चिवडा; चवदार चिवड्यातून यवतमाळचा जागतिक लौकिक
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळच्या ‘चिवड्याचा ब्रँड’ जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अंजनाबाई भुजाडे यांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनीच उजाळा देण्याचा हा प्रयत्न... ते वर्ष होते १९४६. ब्रिटिश राजवटीचा काळ. आलेगावचे (ता. बाभूळगाव) माहेर सोडून यवतमाळच्या भुजाडे परिवारात सासरी आलेली अंजनाबाई गरिबीशी दोन हात करू लागली. महिलां
काळ बदलला पण अंजनाबाईच्या चिवड्याची चव कमी झाली नाही. यवतमाळकरांनी आत्यंतिक आपलेपणाच्या भावनेतून या चिवड्याला ‘बुढीचा चिवडा’ म्हणून लौकिक प्रदान केला. बुढी या शब्दामागे यवतमाळच्या माणसाला ‘माय’ हा अर्थही अभिप्रेत असतो. आज ७२ वर्षांच्या कालखंडानंतर हा चिवडा यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीचा ‘ब्रँड’ बनला आहे. लग्न समारंभ, वाढदिव अशा प्रसंगात या चिवड्याला खास ‘आॅर्डर’ असते. बँक, शाळा, पोस्ट आॅफिस, जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा कोणत्यातरी कार्यालयातून रोज ‘बुढीच्या चिवड्या’चे पार्सल हमखास मागविले जातेच. दररोज ३० पायल्या म्हणजे जवळपास ३५ किलो ‘बुढीच्या चिवड्या’ची उलाढाल होते.
१९७७ मध्ये अंजनाबार्इंचा मृत्यू झाला. पण तिने यवतमाळला दिलेला चिवड्याचा ब्रँड आजही जगभरात जातोय. अंजनाबाईनंतर त्यांचा मुलगा श्रावण, त्यानंतर आता नातू अशोक ‘बुढीचा चिवडा’ विकतात. जेव्हा अंजनाबाईने आझाद मैदानात दुकान लावले, तेव्हा तेथे जंगल होते. आज ते मैदान जणू यवतमाळची चौपाटी बनली आहे. बुढी गेली पण बुढीचा चिवडा आज अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करतोय...
अमेरिका, दुबईतही पोहचला चिवडा
यवतमाळातील अनेकांचे नातेवाईक अमेरिका, दुबई, आॅस्ट्रेलिया, गोवा, कर्नाटक, गुजरात अशा विविध ठिकाणी आहेत. ते यवतमाळात आले की पार्सलच्या पार्सल भरून ‘बुढीचा चिवडा’ घेऊन जातात. अनेकदा तर फोन करून खास पार्सल मागवून घेतात, असे अंजनाबाईचे नातू अशोक भुजाडे सांगतात.