लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतमाल हमीकेंद्र सुरू झाले आहे. मात्र सीमा झाल्याने शेतमाल विक्रीसाठी आणायचा तरी कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. सुरक्षा यंत्रणेने शेतकऱ्यांच्या धान्याची वाहतूक करण्यास नकार दिला आहे. यामुळे हमीकेंद्रावर नंबर लागल्यानंतरही शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी नेताच आला नाही.खुल्या बाजारात तूर आणि हरभऱ्याचे दर पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. नाफेडने ही खरेदी करण्यास राज्याला मंजुरी दिली. मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केंद्र सुरू केले आहेत.शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार बोलावण्यात येत आहे. यासाठी दर दिवसाला ८ ते १० शेतकऱ्यांना माल आणण्याचे संदेश दिले जात आहे. संदेश पाठविण्याची गती अतिशय मंद आहे. विशेष म्हणजे सर्व सीमा सील आहे. यामुळे केंद्रावर शेतमाल नेण्यासाठी रस्ताच उरला नाही. कोरोनामुळे हमालही मिळत नाही.चुकाऱ्याची खात्री नाहीशेतमाल विकायचा असेल तर लॉकडाऊन संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. त्यानंतर शेतमाल विकून पैसे कधी मिळणार हाही प्रश्न आहे. कारण गत दोन वर्षाचा अनुभव पाहता हमीकेंद्रावर तूर आणि हरभरा विकल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी पैसे आले.खरेदीचा वेग कमी आहे. परंतु केंद्र सुरू आहेत. गोदाम रिकामे झाल्यामुळे शेतमाल ठेवण्याचा प्रश्न निकाली निघाला. सीमा सील असल्याने शेतकऱ्यांना अडचणीत येत आहेत.- अर्चना माळवे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी
हमीकेंद्र उघडले, सीमा मात्र सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार बोलावण्यात येत आहे. यासाठी दर दिवसाला ८ ते १० शेतकऱ्यांना माल आणण्याचे संदेश दिले जात आहे. संदेश पाठविण्याची गती अतिशय मंद आहे. विशेष म्हणजे सर्व सीमा सील आहे. यामुळे केंद्रावर शेतमाल नेण्यासाठी रस्ताच उरला नाही. कोरोनामुळे हमालही मिळत नाही.
हमीकेंद्र उघडले, सीमा मात्र सील
ठळक मुद्देशेतमाल विक्रीसाठी आणावा कसा? : तूर आणि हरभरा खरेदीचा गुंता वाढला