शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

थर्टी फर्स्टचा जल्लोष आज घरामध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७८१ वर जाऊन पोहोचला होता. अगदी शेजारच्या नागपूर, नांदेड जिल्ह्यांतही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले असल्याने नव्या नवर्षाचे सेलिब्रेशन करताना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी नववर्षाच्या स्वागतासाठी आता घरातच बेत आखावा लागणार आहे. देशभरात ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णात चिंताजनक वाढ होत असल्याने प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे जोखीम न घेता थर्टी फर्स्टचा जल्लोष यंदाही कुटुंबीयांसोबतच साजरा करण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ७८१ वर जाऊन पोहोचला होता. अगदी शेजारच्या नागपूर, नांदेड जिल्ह्यांतही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले असल्याने नव्या नवर्षाचे सेलिब्रेशन करताना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्य शासनानेही वाढता धोका लक्षात घेऊन रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री नऊनंतर हॉटेलसह गर्दीच्या ठिकाणी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याऐवजी घरातच कुटुंबीयांसह साधेपणाने ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करावे. पोलीस प्रशासनाने सर्व आस्थापना, रेस्टॉरंट, मॉल्स, विविध दुकाने, तसेच उपगृहामध्ये ग्राहकाने, तसेच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक केलेले आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतर राखून परिसर निर्जंतुकीकरण करणेही बंधनकारक आहे. या नियमांचे व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. 

जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांवर उपचार- जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉन बाधित कोरोना रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यासमोर वाढत्या कोरोनाचा धोका कायम आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजवर ७२ हजार ९७९ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७१ हजार १८५ जणांनी कोरेानावर मात केलेली असून, आजवर या आजारामुळे १७८८ जणांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगून उत्साह साजरा करण्याची आवश्यकता आहे. 

 

टॅग्स :New Yearनववर्ष