जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी

By Admin | Updated: June 27, 2017 01:31 IST2017-06-27T01:31:13+5:302017-06-27T01:31:13+5:30

शहरासह जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या इदगाहवर विश्वशांती आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

Celebrate Eid in the district | जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी

जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरासह जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या इदगाहवर विश्वशांती आणि सामाजिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
रमजान ईदची नमाज अदा करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच मशिदीसह इदगाह मैदानावर समाज बांधवांची उपस्थिती होती. यवतमाळ शहरातील कळंब चौकातील इदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लीम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानात नमाज अदा करण्यात आली. हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Celebrate Eid in the district