शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

दिग्रसमध्ये ईद उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:38 PM

आपण एकीकडे नवीन संशोधन करून पृथ्वीला नंदनवन बनविण्यात व्यस्त आहोत, तर दुसरीकडे मानव जातीसमोर दररोज तेवढ्याच समस्या उभ्या ठाकत आहे.

ठळक मुद्देबाराभाई मोहल्ला चौकात सभा : काजी मौलाना अबू जफर यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : आपण एकीकडे नवीन संशोधन करून पृथ्वीला नंदनवन बनविण्यात व्यस्त आहोत, तर दुसरीकडे मानव जातीसमोर दररोज तेवढ्याच समस्या उभ्या ठाकत आहे. मात्र प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या शिकवणुकीत जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निदान व उपचार आहे, असे प्रतिपादन काजी मौलाना अबू जफर यांनी केले.दिग्रसमधील बाराभाई मोहल्ला येथे शनिवारी दुपारी ईद-ए-मिलादनिमित्त जमलेल्या विशाल जनसागराला उद्देशून ते बोलत होते. शहरातील विविध भागातून सकाळी अनेक मिरवणुका निघून त्याचे रूपांतर विशाल मिरवणुकीत झाले. मिरवणुकीत सहभागी मुस्लीम बांधव प्रेषित-स्तवन गात मुख्य मार्ग व चौकातून मार्गक्रमण करीत होते. दुपारी विशाल मिरवणुकीचे बाराभाई मोहल्ला येथे सभेत रूपांतर झाले. तेथे सामूहिक सलाम व फातेहा-ख्वानीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी शहरातील विविध मशिदींचे इमाम मंचावर उपस्थित होते. विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील ईद-ए-मिलादमुळे शहरातील मुख्य मार्ग व चौकांना मागील दहा दिवसांपासून आकर्षक कमानी व फरारे लावून सजविण्यात आले होते. शनिवारच्या मिरवणुकीत सहभागी मुस्लीम बांधवांसाठी शहरातील अनेक धार्मिक, सामाजिक व स्वयंसेवी संघटनांतर्फे शरबत, मिठाई, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. नगरपरिषदेचे आरोग्य सभापती जावेद पहलवान व माजी उपनगराध्यक्ष जावेद पटेल यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.या मिरवणुकीत हिदू बांधवांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, बांधकाम सभापती बालू जाधव, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, नगरसेवक केतन रत्नपारखी, रवींद्र अरगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रमोद बनगिनवार, गणेश भातुकले, पूनम पटेल, राहुल देशपांडे, संजय खंडरे, हर्षिल शाह, विनायक दुधे, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले, राहुल शिंदे आदींसह सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते.