संविधानाची प्रत भेट देऊन ढाणकीत भीम जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:42+5:302021-04-16T04:42:42+5:30
सध्या कोरोना काळात जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करणारे पत्रकार, लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू दरम्यान जीव धोक्यात घालून कर्तव्य ...

संविधानाची प्रत भेट देऊन ढाणकीत भीम जयंती साजरी
सध्या कोरोना काळात जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करणारे पत्रकार, लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू दरम्यान जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. येथील जुने बसस्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून पत्रकार, पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशहितासाठी दिलेल्या बहुमोल योगदान आणि कार्यास उजाळा देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड, लड्डा घुगरे, सुमित विणकरे, आकाश राऊत, समाधान राऊत, गोलू मुनेश्वर, शाम राऊत, गुंटू राऊत, अविनाश गायकवाड, शुभम गायकवाड, रमेश कदम, पप्पू गायकवाड, रामा गायकवाड, प्रेम कदम, बालू गायकवाड, राहुल पोहरे, अजय हडसे, अमोल कानिंदे, अभी कनिंदे, मंगेश गायकवाड, विवेक कशिनंद, जुग्गू भाई, विजू गायकवाड, संदीप विणकरे, भास्कर राऊत, किरण भालेराव, सुमित कदम, गज गोरटकर आदी उपस्थित होते.