पुसदमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Updated: June 14, 2015 02:51 IST2015-06-14T02:51:18+5:302015-06-14T02:51:18+5:30
शहर संवेदनशील म्हणून ओळखले जात असून शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी पुसद चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने...

पुसदमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
पुसद : शहर संवेदनशील म्हणून ओळखले जात असून शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी पुसद चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने शुक्रवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी तत्काळ ही मागणी मान्य करून एक महिन्याच्या आत पुसद शहरातील चौकांमध्ये २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची ग्वाही दिली.
पुसद येथे आयोजित जनता दरबारासाठी पालकमंत्री संजय राठोड पुसद येथे आले असता विश्रामगृहावर चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतले. येथील गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी गांधी चौक, सुभाष चौक, आंबेडकर चौक, गुजरी चौक, मुखरे चौक, शिवाजी चौक, कापड लाईन, महात्मा फुले चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली. बाजारपेठेत दोन ठिकाणी चौकी उभारण्याचे निवेदन चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुबेवार यांनी दिले. ना.राठोड यांनी मागण्या रास्त असून येत्या एक महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी राम पद्मावार, संदीप जिल्लेवार, विक्रम जिल्लेवार, शक्ती आसेगावकर, गिरीश अग्रवाल, संतोष अग्रवाल, संजय गजबी, संजय चिद्दरवार, विनायक डुबेवार,
अॅड.उमेश चिद्दरवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)