शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्ह्यात ‘सीबीएसई’ दहावीत मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:00 AM

यवतमाळ पब्लिक स्कूलसह पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, सेन्ट अलॉयसीस स्कूल, डव पब्लिक स्कूल निलजई वणी, जेट किडस् पुसद, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९९ टक्के, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा निकाल ९८ टक्के लागला. घाटंजी तालुक्याच्या बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल ९७.४३ टक्के लागला आहे.

ठळक मुद्देमहर्षीचा कविश पांडे अव्वल : ‘वायपीएस’ची कनिष्का गाडे द्वितीय, निधी जाधव तिसरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी बाजी मारली. जिल्ह्यात महर्षी विद्या मंदिरचा विद्यार्थी कविश आनंद पांडे ५०० पैकी ४९३ गुण (९८.६० टक्के) घेऊन जिल्ह्यात अव्वल राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी अनुक्रमे कनिष्का प्रशांत गाडे (९८.२० टक्के), निधी मनोज जाधव (९८ टक्के) यांनी बाजी मारली. पुसद येथील जेट किड्सचा विद्यार्थी प्रथमेश नितीन पामपट्टीवार हासुद्धा ९८ टक्के गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे राहिला.कनिष्का गाडे ही विद्यार्थिनी यवतमाळ पब्लिक स्कूलमधून पहिला तर जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलने आपली शंभर टक्के यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.यवतमाळ पब्लिक स्कूलसह पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, सेन्ट अलॉयसीस स्कूल, डव पब्लिक स्कूल निलजई वणी, जेट किडस् पुसद, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९९ टक्के, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा निकाल ९८ टक्के लागला. घाटंजी तालुक्याच्या बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल ९७.४३ टक्के लागला आहे.पोदार इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी विक्रमादित्य बजाज ९७.६० टक्के गुणांसह शाळेतून पहिला राहिला. स्कूल ऑफ स्कॉलर्समधील गौतमी देशमुख ९७.०८ टक्क्यासह शाळेतून अव्वल राहिली.दहावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी आपला ठसा उमटवित टक्केवारीत आघाडी घेतली आहे. सीबीएसई दहावीचा निकाल येणार असल्याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांमध्ये होती. जिल्ह्यात २ वाजतानंतर संचारबंदी असल्याने पालकांनी ऑनलाईनच निकाल मिळविण्याची धडपड केली. शाळांनीसुद्धा टॉपर विद्यार्थ्यांची यादी काढून गोड बातमी पालकांना दिली.कविशला व्हायचेयं संगणक अभियंतासीबीएसई दहावीत जिल्ह्यातील टॉपर कविश पांडे हा उमरसरातील छत्रपतीनगर येथील रहिवासी आहे. त्याला संगणक अभियंता व्हायचे आहेत. मात्र हे शिक्षण त्याला यवतमाळातच घ्यायचे आहे. तो दररोज चार तास अभ्यास करायचा. आपले कुटुंबच आपला आदर्श असल्याचे कविशने ‘लोकमत’ला सांगितले. त्याचे आई-वडील येथेच बँकींग क्षेत्रात कार्यरत आहेत. अभ्यासातील सातत्य कायम ठेवल्यास सर्वाधिक गुण मिळविणे शक्य असल्याचे कविशने सांगितले.तिघेही भाऊ दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्णघरातील वातावरण अभ्यासमय असेल तर मुल तितकीच गुणवंत होतात, याचाच प्रत्यय पांडे कुटुंबीयांना आला आहे. कविश आणि केतन ही जुळी भावंडे आहेत. त्या दोघांनाही चांगले गुण मिळाले आहेत. कविश जिल्ह्यात प्रथम आहे. केतनला ८८.८९ टक्के गुण मिळाले आहेत. कविशचा चुलत भाऊ केयूर विवेक पांडे याला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. एकाच कुटुंबात एकाच ठिकाणी वास्तव्याला असणाºया पांडे परिवाराला एकत्रपणामुळे गुणवत्तेत भरारी घेता आली, अशी प्रतिक्रिया कविशचे वडील आनंद पांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा