लोकमत न्यूज नेटवर्कवणी : औष्णिक वीज केंद्रांना धुतलेला कोळसा पुरवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीआय व वेकोलि विजीलंसच्या एका पथकाने गुरुवारी सकाळी वेकोलि वणी क्षेत्रातील निलजई कोळसा खाणीच्या कार्यालयात व घुग्घुस येथील महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कोल वॉशरीवर धाड टाकल्याची माहिती पुढे आली आहे.
ही संयुक्त कारवाई बुधवारी संध्याकाळी निलजई खाणीतून सुरू झाली. वेब्रिजवरील कामगारांची बराच वेळ चौकशी करण्यात आली आणि वाहतूक कागदपत्रे, गेट पास आणि नमुन्याचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात या कोलवॉशरीजच्या माध्यमातून अनेक राज्यातल्या कोळसा रॅकेटचे संचालन करण्याची माहिती समोर आली आहे. या कोळसा घोटाळ्याची व्याप्ती ५०० कोटींच्यावर असल्याची माहिती आहे. वणीतील हिंद महामिनरल व घुग्घुस येथील महामाया कोलवॉशरीचे संचालन बिलासपूरचे राजीव अग्रवाल व त्यांच्या पार्टनरद्वारा केल्या जाते. तपास यंत्रणेने महामाया कोळसा वॉशरीमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. कागदपत्रांमधून कोळशाचा अपहार, बनावट बिलिंग आणि बेकायदेशीर वाहतुकीचे मोठे जाळे उघड होऊ शकते. सीबीआयने महामाया कंपनीचे मुख्य या कार्यकारी अधिकारी (सीओओ) आशिष अग्रवाल यांचीही चार तास सखोल चौकशी करण्यात आली. सीबीआयने त्यांच्याकडून कंपनीच्या कामकाजाबाबत, कोळशाचा पुरवठा, वाहतूक आणि बिलिंगबाबत माहिती घेतली. सीबीआयने वंदना ट्रान्सपोर्टशी संबंधित अनेक वाहनांची व कागदपत्रांची तपासणी केली. सीबीआयने तपासात पुरावा म्हणून वापरण्यासाठी या वाहनांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रेसुद्धा घेतली. पथकात समाविष्ट अधिकाऱ्यांनी सध्या माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यांनी फक्त असे सांगितले की प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
"महामाया कोल वॉशरीमध्ये सीबीआय येण्याचे कारण वेकोलिशी संबंधित काही माहिती त्यांना हवी होती. अन्य काही कारण नाही आहे."- आशिष अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, महामाया कोल वॉशरी.
"महामाया कोल वॉशरी व निलजई कोळसा खाणीचे प्रकरण सीबीआयशी संबंधित आहे. आमचा स्टॉफ फक्त त्यांच्या सोबत होता."- अजय मधुकर म्हेत्रे, मुख्य दक्षता अधिकारी, वेकालि.
Web Summary : CBI raids reveal a ₹500 crore coal scam involving coal washing plants and illegal transport. Investigations target Mahamaya Infra and Hind Mahamineral, uncovering potential fraud and illicit activities. Officials are being questioned, documents seized, and further probes are underway.
Web Summary : सीबीआई छापों में कोयला धुलाई संयंत्रों और अवैध परिवहन से जुड़े ₹500 करोड़ के कोयला घोटाले का खुलासा हुआ। महामाया इन्फ्रा और हिंद महामिनरल पर जांच, संभावित धोखाधड़ी और अवैध गतिविधियों का पर्दाफाश। अधिकारियों से पूछताछ, दस्तावेज जब्त और आगे की जांच जारी।