जनावरांचे मांस नेणारा ट्रक पकडला
By Admin | Updated: September 28, 2016 00:54 IST2016-09-28T00:54:53+5:302016-09-28T00:54:53+5:30
जनावरांचे मांस वाहून नेत असलेला ट्रक दारव्हा पोलिसांनी २६ सप्टेंबरचे रात्री १० वाजताचे दरम्यान पिंपळखुटा येथे पकडला.

जनावरांचे मांस नेणारा ट्रक पकडला
चार जण अटकेत : पिंपळखुटातील घटना
दारव्हा : जनावरांचे मांस वाहून नेत असलेला ट्रक दारव्हा पोलिसांनी २६ सप्टेंबरचे रात्री १० वाजताचे दरम्यान पिंपळखुटा येथे पकडला. यासोबत असलेली स्विफ्ट कारसह चार जणांना अटक केली तर एक जण फरार झाला आहे.
नागपूर येथून ट्रक क्र.एम.एच.४०/वाय-३७९८ हा जनावरांचे मांस ोरून वाहू नेत असताना दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा येथे या ट्रकची एका मालवाहू वाहनाला कट लागल्याने गावकऱ्यांनी ट्रक अडविला असता ट्रकात मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावकऱ्यांनी याबाबत दारव्हा पोलिसांना याची माहिती दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी या ट्रकसोबत एक स्विफ्ट कारसुद्धा होती. हे मांस नागपूरवरून चोरट्या मार्गाने कर्नाटकमधील बिदर येथे जात असताना पकडल्यात आले. या बाबतची तक्रार भाऊसिंग भीमराव चव्हाण रा.पिंपटखुटा यांनी दारव्हा पोलिसात दिली. यावरून आरोपी मो.अक्रम शेख इब्राहीम, मो.सादिक मो.सलीम (२८), शेख अशफाक शेख कदीर (३४) ट्रकचालक भीमराव दशरथ गजभिये रा.पाचपावली नागपूर यांना अटक केली, तर स्विफ्ट कारचा चालक शेख वहीद शेख कासम हा कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला.
ट्रकात एकूण सात टन मांसासह ट्रक व कार असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी हत्त्या कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पुढील तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम यांचे मार्गदर्शनात पीएसआय गावंडे करीत आहे.
(तालुका प्रतिनिधी)