दलित वस्तीतील कामांची वाताहत

By Admin | Updated: February 4, 2016 02:29 IST2016-02-04T02:29:00+5:302016-02-04T02:29:00+5:30

दलित वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यातील २२ गावात सिमेंट रस्ते करण्यात आले.

Cattle deaths in Dalit habitats | दलित वस्तीतील कामांची वाताहत

दलित वस्तीतील कामांची वाताहत

निकृष्ट रस्ते : माळेगावच्या नागरिकांचे उपोषण
महागाव : दलित वस्त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यातील २२ गावात सिमेंट रस्ते करण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ३४ लाख रुपयाचा खर्च करण्यात आला. मात्र अनेक गावात दलित वस्त्यांना विकास कामापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी निकृष्ट कामे करण्यात आल्याचा अरोप आहे. तर माळेगाव येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.
सामाजिक न्याय विभागच्यावतीने मिळालेल्या या निधीतून सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली. २१ नोव्हेंबर २०१५ च्या दरम्यान या कामाच्या भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. तीन लाखांच्या वरच्या कामाचे ई-टेंडर आवश्यक असल्याने २ लाख ९० हजाराचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यामुळे
सदर काम थेट कार्यकर्त्यांना देता आले. या कामाचे वाटप फुलसावंगीमधून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे टक्कवारीचे ग्रहण लागले. त्यातून कामात दर्जा राहिला नाही. या कामाची नामधारी एजंसी संबंधित ग्रामपंचायत असली तरी अलिखित कारारातून ही कामे आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनीच केली असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारीच सांगत आहेत. एजंसी ग्रामपंचायत असून पैसे काढण्याचे अधिकार ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे माळेगाव, फुलसावंगी, राजुरा अन्य गावच्या कामाविषयी तक्रारी आहे. माळेगाव येथील विलास पाईकराव, दीपक राठोड या ग्रामपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांनी महागाव पंचायत समिती कार्यालयासमोर चार दिवस आमरण उपोषण करून या रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्याची माणगी केली आहे. रामेश्वर पवार, अमरसिंग राठोड यांचे साखळी उपोषण सुरू आहे.
फुलसावंगी, राजुरा येथील कामात दर्जाच राहिला नाही. त्यामुळे या दोनही ठिकाणचे काम गावकऱ्यांनी थांबले होते. अशाच तक्रारी कमी अधिक प्रमाणात अन्य दलित वस्तीच्या सुरू असलेल्या कामाबाबत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Cattle deaths in Dalit habitats