शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांवर दाखल केले गुन्हे; शेतमालाचे दर घसरल्याने साजरी केली होती काळी दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:54 IST

Yavatmal : शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकाला बाजारात कवडीमोल भाव

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. शासनाकडून हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. कापूस व सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात लागवड खर्च झाला आहे. नफा सोडा, हा खर्चही निघणार नाही, अशा दरात शेतमाल खरेदी केली जात आहे. या अन्यायाविरोधात दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असा ठपका ठेवत शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

शेतकरी वारकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले. शेतमालाला सरकारने हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी प्रतीकात्मक काळी दिवाळी येथे शेतकऱ्यांनी साजरी केली. या आंदोलनाची दखल घेण्याचे सोडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आचारसंहितेतील फिरत्या पथकाचे प्रमुख प्रकाश वाघमारे यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून शहर पोलिसांनी गुन्हे नोंदविण्याची कारवाई केली. 

निवडणूक पथकाची पोलिसात तक्रार सिकंदर शाह, विजय निवल, अशोक भुतडा, पवन थोटे, प्रवीण कांबळे, बाळासाहेब जीवने, श्रीराम डंगारे, दादाराव घोडे, रामदास शिंदे, दीपक मडसे, अविनाश रोकडे, विश्वनाथ फुपरे, रूशांत पिंपळकर, नारायण अगलधरे, ना.बा. आगलावे, मोरे महाराज, मनोज पाचघरे यांच्यासह १५ जणांविरुद्ध कलम २२३ भारतीय न्याय संहिता, सहकलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ