‘वायपीएस’मध्ये कार्निव्हल उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:11 IST2017-12-29T23:10:48+5:302017-12-29T23:11:19+5:30

यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले.

Carnival in Yps | ‘वायपीएस’मध्ये कार्निव्हल उत्साहात

‘वायपीएस’मध्ये कार्निव्हल उत्साहात

ठळक मुद्देयवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा होते. शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, आनंदराव गावंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. समन्वयक प्रज्ञा पोहेकर, निशा जोशी यांची मंचावर उपस्थिती होती. माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला हारार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
विविधतेतून एकता, बेटी बचाओ, प्लास्टिकचा वापर, आनंददायी शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आध्यात्म, पाण्याची बचत, बाल संगोपन आदी विषयांवर निवडलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालण्यात आला. यासाठी मुख्याध्यापिका निहारिका प्रभुणे, समन्वयक सुनीता नवघरे आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title: Carnival in Yps