कार अपघातात आईसह मुलगी ठार

By Admin | Updated: July 28, 2015 03:20 IST2015-07-28T03:20:16+5:302015-07-28T03:20:16+5:30

मानकोपराजवळची घटना : वडील-मुलगा गंभीर, यवतमाळच्या सिंघानियानगरातील परिवार

In a car accident, the girl killed the mother | कार अपघातात आईसह मुलगी ठार

कार अपघातात आईसह मुलगी ठार

मानकोपराजवळची घटना : वडील-मुलगा गंभीर, यवतमाळच्या सिंघानियानगरातील परिवार
दारव्हा : भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात आईसह मुलगी ठार झाली. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा-कारंजा मार्गावरील मानकोपरा गावाजवळ सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी मुलाला नागपूर येथे तर वडिलांना यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
आरती अनिल कठाळे (२८), भाविनी अनिल कठाळे (९) असे मृत मायलेकीचे नाव आहे. तर अनिल कानुजी कठाळे (३०) आणि मुलगा ओम अनिल कठाळे (४) अशी जखमींची नावे आहे. दारव्हा तालुक्यातील मूळ लाखखिंड येथील अनिल कठाळे आपल्या व्यवसायानिमित्त यवतमाळच्या सिंघानियानगरात राहतात. त्यांचा ओम साई पॉवर टूल हा व्यवसाय आहे. रविवारी रात्री ते परिवारासह मारूती सुझुकी स्वीप्ट कार एम.एच.३१- सीपी-८८०८ ने सासूरवाडी असलेल्या दर्यापूर तालुक्यातील निमखेड बाजार येथे जात होते.
दारव्हा ते कारंजा मार्गावरील मानकोपरा गावाजवळ पहाटे २ वाजताच्या सुमारास कार चालवीत असलेल्या अनिलचे नियंत्रण गेले आणि कार सरळ झाडावर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, आरती आणि भाविनी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल कठाळे व त्यांचा मुलगा ओम कठाळे गंभीर जखमी झाले. अपघातात ठार झालेली भाविनी यवतमाळच्या जॉयन्टस् इंग्लिश स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होती तर आरती गृहिणी होती. दारव्हा येथे शवविच्छेदन पार पडल्यानंतर लाखखिंड येथे सोमवारी दुपारी मायलेकींवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: In a car accident, the girl killed the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.