शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

क्षमता सव्वा लाख हेक्टरची ओलित 14 हजार हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव, नवरगाव, अडाण या प्रकल्पांसह ८५ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन करण्यात येते. या प्रकल्पांची सिंचन क्षमता १ लाख २७ हजार ५२५ हेक्टरची आहे.

ठळक मुद्देअपुरे कॅनॉल : गेट नसणे, अभियंत्यासह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले सिंचन प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. निर्माण झालेल्या सिंचन प्रकल्पातून ठरविलेले उद्दिष्ट अद्यापही गाठता आले नसल्याची गंभीरबाब सिंचनाच्या टक्केवारीवरून पुढे आली आहे. जिल्ह्यातील निर्मित प्रकल्पांची सिंचन क्षमता सव्वालाख हेक्टरची आहे. प्रत्यक्षात यातून केवळ १४ हजार १७९ हेक्टरवर ओलित होत आहे. यामुळे हे प्रकल्प शोभेची वस्तू ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी प्रकल्प उभारण्याला मंजुरात मिळाली, असे प्रकल्प पूर्णही झाले. मात्र त्या प्रकल्पातून सिंचनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. जिल्ह्यातील बेंबळा, अरुणावती, पूस, अधरपूस, गोखी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव, नवरगाव, अडाण या प्रकल्पांसह ८५ लघु प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचन करण्यात येते. या प्रकल्पांची सिंचन क्षमता १ लाख २७ हजार ५२५ हेक्टरची आहे. प्रकल्प उभे झाले, मात्र प्रकल्पात पाणी वाहून नेणारे कॅनॉल दोषपूर्ण आहे. या कॅनॉलमध्ये अनेक ठिकाणी चढउतार आहे. तर काही भागांमध्ये कॅनॉलच्या परिसरात मोठमोठी काटेरी झुडूपे उभे आहेत. यामुळे पाणी पुढे सरकत नाही. कॅनॉलला पाणी वाहून नेण्यासाठी असलेले दरवाजे अनेक ठिकाणी चोरीला गेले आहे. यामुळे कॅनॉलमधून एकदा पाणी सुटल्यानंतर ते एकाच भागात वाहत राहते. काम संपल्यानंतर पाटसऱ्यांचे गेट बंद करून पाणी पुढे जाण्याचा मार्ग दाखविला जात नाही. या ठिकाणी कार्यान्वित असणारे कर्मचारी अपुरे आहेत. यामुळे कॅनॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. कॅनॉलचे पाणी प्रत्येकाला मिळावे, यासाठी गावोगावी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या ठिकाणचे नियोजन मात्र होत नाही. यामुळे कुणी किती पाणी वापरावे याचे बंधन राहिलेले नाही. पाणीकर भरल्या जात नाही. यामुळे कॅनाॅलवरची दुरुस्ती होत नाही. पावसाळ्यात पूर आल्याने अनेक ठिकाणी कॅनॉलमध्ये मुरुम वाहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर संचय झाल्याचे चित्र पहायला मिळते. तर काही ठिकाणी हे कॅनॉल खचले आहे. त्यासाठी देखभाल दुरुस्तीचा मिळणारा निधीही अपुरा आहे. प्रकल्प क्षेत्रात पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. हजारो हेक्टर जमीन धरणात, पण सिंचन वाढलेच नाही प्रकल्प क्षेत्रामध्ये सिंचन होईल म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. प्रत्यक्षात प्रकल्प झाल्यानंतर या प्रकल्प क्षेत्रात अजूनही पूर्ण क्षमतेने सिंचन झाले नाही. याची खंत आजही या भागातील शेतकरी बोलून दाखवितात. प्रकल्पासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. यातून अनेक जण धरणग्रस्त म्हणून नोंदविल्या गेलेत. त्यांच्या जमिनीचे मूल्य सिंचन न झाल्याने शून्य झाल्यासारखेच आहे. एकीकडे जमिनी गेल्या, दुसरीकडे उत्पन्नाचे साधनही गेले. अशा परिस्थितीत बेरोजगारी या कुटुंबांपुढे उभे ठाकली आहे. राज्य शासनाने प्रकल्प क्षेत्रामध्ये पुन्हा नव्या जोमाने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे आणि प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी गावांमध्ये होत आहे. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प