शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवं होतं; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 18:30 IST

पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत.

यवतमाळ - नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी आवाज उठविला असला तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, तसे झाले असते तर अनेक शेतकरी-शेतमजुरांचे जीव वाचू शकले असते असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी केले आहे. 

पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. अखेर वन खात्याने या वाघिणीला नुकतेच गोळी घालून ठार केले. मात्र तिला गोळ्या का घातल्या म्हणून वन्यजीवप्रेमींनी देशभर ओरड चालविली आहे. मुख्यमंत्री, वनमंत्री यांना धारेवर धरले जात आहे. वन खात्याची नियमावली वाचून दाखविली जात आहे. त्याच वेळी या दोन विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेसकडून अनेक वर्ष प्रतिनिधीत्व करणारे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके (राळेगाव), अ‍ॅड. शिवाजीराव मोघे (केळापूर-आर्णी) आणि मिशनचे अध्यक्ष किशोत तिवारी यांनी मात्र जनतेच्या हितासाठी वाघिणीला ठार करण्याच्या वन खात्याच्या कारवाईचे समर्थन केले आहे. 

वन खात्याने संयम राखला  - अ‍ॅड.  मोघे 

वन खात्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कोणतेही प्रयत्न न करता थेट गोळ्या घातल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींकडून होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याने अवनीला पकडण्यासाठी खूप संयम राखला व वर्षभर प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. तिला ठार मारायचे नव्हते, बेशुद्ध करण्याचेच प्रयत्न झाले. मात्र ती टप्प्यात येत नव्हती. अखेर वन खात्याचाही नाईलाज झाला. कारण जनतेचे जीव महत्वाचे असल्याचे मोघे यांनी सांगितले.

वनखात्याने विलंब केला - प्रा. पुरके

माजी मंत्री प्रा. वसंत पुरके म्हणाले, वाघिणीने पहिली शिकार केल्यानंतर वन खात्याने लगेच पावले उचलून तिला बेशुद्ध करण्याचे, पकडण्याचे प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र वन खात्याने त्याकडे बरेच दुर्लक्ष केले. मध्यंतरीच्या काळात तिला बेशुद्ध करण्याच्या मिळालेल्या तीन संधी  दवडल्या गेल्या. १३ जीव गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, वाघिणीच्या दहशतीत हजारो एकर शेती पडिक आहे. त्यामुळे तिचा बंदोबस्त करणे गरजेचेच होते. वन्यजीवप्रेमींनी प्रत्यक्ष वाघदहशतग्रस्त भागात भेट दिल्यास त्यांना ‘वास्तव’ कळू शकेल, असेही पुरके यांनी सांगितले.

मनेका गांधी शेतकरी विरोधी -  तिवारी

वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, दिल्ली, मुंबईत बसलेल्या वन्यजीवप्रेमींनी वन खात्याच्या वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेत याचिका व अन्य माध्यमातून सातत्याने अडथळे आणले. आजही ही मंडळी वन खात्यावर तोंडसुख घेत आहे. त्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत. मात्र त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. पर्यायाने त्यांच्याकडून सरकारवर केली जात असलेली टीका शेतकरी व आदिवासी विरोधी ठरत आहे. अशा आगावू मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच आवर घालावा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना विनम्रपणे दिलेल्या उत्तराचे किशोर तिवारी यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAvani Tigressअवनी वाघीणcongressकाँग्रेस