शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

उमेदवारी मागणारे होते प्रचारकाळात क्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 5:00 AM

राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे.

ठळक मुद्देराळेगाव विधानसभा : २५ वर्षांपासून त्याच त्या उमेदवाराचा वीट

के.एस. वर्र्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करूनही अपयशी ठरलेले इच्छुक निवडणूक काळात दिसेनासे झाले होते. अपवाद वगळताच इच्छुकाचा चेहरा झळकत होता. राळेगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२ जणांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील २५ वर्षांपासून एकखांबी तंबू राहिलेल्या नेत्याने पक्षाचे तिकीट तर आणले पण त्यांना विजय मात्र मिळविता आला नाही.राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. मात्र असे चेहरे समोर आलेले नाही, येऊ दिले गेले नाही. प्रा.वसंत पुरके हेच सतत एकखांब तंबूप्रमाणे राळेगाव विधानसभा निवडणुकीचा किल्ला लढवित राहिले आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी निवडणुकीची तयारी केली. मतदारसंघात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला. प्रसंगी आंदोलने केली केली. कधीतरी संधी मिळेल या आशेपोटी त्यांचे हे कार्य सुरू राहिले. पक्षाने मात्र त्यांची प्रत्येकवेळी निराशा केली.यावेळच्या विधानसभेसाठी पक्षाकडे १२ उमेदवारांनी अर्ज केले होते. नवीन चेहरा या मतदार संघात दिला जाईल, असे वातावरण शेवटपर्यंत होते. मात्र अखेरच्या क्षणी प्रा.वसंत पुरके हे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेण्यात यश आले नाही. तिकीट मागणाऱ्यांमधील अपवादात्मक चेहराच प्रचार करताना दिसत होता.गत पाच वर्षात प्रा. पुरके यांच्याकडे कधी ऐकेकाळी असलेल्या एंबडवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या शक्तीशिवाय दुसरे कार्यकर्ते नव्हते, ही वस्तूस्थिती होती. ही शक्ती आणि ठेकेदारांची शक्ती वजा जाता प्रा. पुरके यांच्याकडे पुर्वी कधी सोबत असणारे जिवाभावाचे कार्यकर्ते कधीच दूर झाले होते.सरलेल्या काळात त्यांचे सहकाºयांशी वेळोवेळी मतभेद झालेले आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम प्रा. पुरके यांना विजयापासून दूर ठेवण्यात झाला, असे सांगितले जाते.नेत्यांच्या भूमिकेचाही फटकाकळंब तालुक्यातील प्रवीण देशमुख, राळेगावातील प्रफुल्ल मानकर यांचा गट कधी राष्ट्रवादीत, कधी काँग्रेसमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, लोकसभा, विधानसभा निवडणुकात विरोधात लढला आहे. यात अनेक कार्यकर्ते जिंकले, अनेक हरले. हरलेल्यांचा पैसा, वेळ, श्रम गेले. शस्त्रुत्व आले. नेत्यांचे रंग बदलने अनेक कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यांनी स्वस्थ बसणे किंवा भाजपकडे वळणे पसंत केले. त्यामुळेच कळंबमध्ये शक्ती असूनही काँग्रेसला कमी तर भाजपला अधिक मते मिळाली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक