वणी, राजूरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन
By Admin | Updated: October 11, 2014 23:15 IST2014-10-11T23:15:31+5:302014-10-11T23:15:31+5:30
येथील पोलिसांनी सिक्कीम येथील निमलष्करी जवानांच्या सहकार्याने शनिवारपासून कोम्बिंग आणि सर्च मोहीम सुरू केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे.

वणी, राजूरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन
वणी : येथील पोलिसांनी सिक्कीम येथील निमलष्करी जवानांच्या सहकार्याने शनिवारपासून कोम्बिंग आणि सर्च मोहीम सुरू केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत शनिवारी वरोरा पॉर्इंट, मुकुटबन टी पॉर्इंट, नांदेपेरा मार्ग, शहरातील दाट वस्ती, राजूर कॉलरी, भारत माता चौक आदी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. पोलीस आणि निमलष्करी जवानांनी वाहनांची तपासणी केली. कोणत्या वाहनांतून निवडणुकीसाठी दारु, पैसा, घातक शस्त्रे जात आहेत काय, याची यावेळी तपासणी करण्यात आली.
येथील ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा वाडेकर, माहुरे, जाधव, भगत, सिंग यांच्यासह ६४ निमलष्करी जवान आणि ११४ पोलिसांनी त्यात सहभाग घेतला. निवडणुकीसाठी वणीत तीन कंपनी कमांडरसह त्यांचे एकूण ८0 जवान शहरात दाखल झाले आहेत. ही कोम्बिंग आणि सर्च पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत सतत सुरूच राहणार असल्याची माहिती ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)