बायपास गेला खड्डय़ात ..
By Admin | Updated: May 9, 2014 01:23 IST2014-05-09T01:23:10+5:302014-05-09T01:23:10+5:30
बायपास गेला खड्डय़ात ..

बायपास गेला खड्डय़ात ..
यवतमाळ शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बायपास रस्त्याची निर्मिती करण्यात आली. मात्र योग्य देखभालीअभावी पिंपळगाव परिसरातील बायपासवर चक्क दोन ते तीन फुटाचे खड्डे पडले आहे. खड्डे चुकविताना वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वाहनधारक तर बायपासऐवजी शहरातून मार्ग काढताना दिसून येतात. यवतमाळ शहराच्या चारही बाजूला असलेल्या बायपासची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या बायपासने जाण्यास वाहधारक धजावत नसल्याचे दिसून येते. बांधकाम विभाग मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.