यवतमाळात उद्योजकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:47 IST2017-12-31T22:47:39+5:302017-12-31T22:47:49+5:30

येथील उद्योजक आणि भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश लक्ष्मीदास गंडेचा (३६) यांनी आपल्या एमआयडीसी स्थित बेसन मिलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली.

Businessman Suicide in Yavatmal | यवतमाळात उद्योजकाची आत्महत्या

यवतमाळात उद्योजकाची आत्महत्या

ठळक मुद्देबेसन मिलमध्ये गळफास : भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील उद्योजक आणि भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश लक्ष्मीदास गंडेचा (३६) यांनी आपल्या एमआयडीसी स्थित बेसन मिलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली.
वाघापूर परिसरातील राधाकृष्णनगरीतील रहिवासी असलेले हितेश गंडेचा यांची लोहारा एमआयडीसी परिसरात गंडेचा बेसन मिल आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी लोहारा पोलिसांना दिली. त्यावरून उपनिरीक्षक मडावी यांनी घटनास्थळ गाठले. गंडेचा यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. या प्रकरणी हरीश हिंमतलाल विठ्ठलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हितेश गंडेचा हे भाजपाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. यवतमाळ शहरात व्यापाºयाने आत्महत्या करण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना होय. यापूर्वी सराफा व्यापारी संजय कैपिल्यवार यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती.

Web Title: Businessman Suicide in Yavatmal