ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद; विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:44+5:302021-08-14T04:47:44+5:30
तसेच अनेक बसफेऱ्या रद्द होत असल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सामान्य प्रवासी एसटीपासून दूर जात आहेत. ...

ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद; विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे?
तसेच अनेक बसफेऱ्या रद्द होत असल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सामान्य प्रवासी एसटीपासून दूर जात आहेत. पांढरकवडा आगारातर्फे तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी आगारातर्फे ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना एसटी सवलत पास व मुलींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत पास देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणाकरिता पांढरकवडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेत आहेत; पण ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकरिता यावे तरी कसे, असा बिकट प्रश्न आहे. अनेक गावात बस जात नसल्याने काही विद्यार्थी खासगी वाहनांचा आधार घेऊन शाळेत पोहोचत आहे. मात्र, अनेकदा ग्रामीण भागातील प्रवासी मिळाले नाही तर खासगी ऑटोसुद्धा शाळेच्या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आगाराने याकडे लक्ष देऊन तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.