राजूर काॅलनी येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:31 IST2021-07-17T04:31:27+5:302021-07-17T04:31:27+5:30

वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी साहेबी फत्ते बहादुर हे मुलीच्या लग्नासाठी रायगड येथे गेले होते. त्यामुळे २१ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत ...

Burglary at Rajur Colony | राजूर काॅलनी येथे घरफोडी

राजूर काॅलनी येथे घरफोडी

वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी साहेबी फत्ते बहादुर हे मुलीच्या लग्नासाठी रायगड येथे गेले होते. त्यामुळे २१ एप्रिल ते १५ जुलैपर्यंत या घरात कुणीच राहत नव्हते. याचदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे मागील तार तोडून दागिने लंपास केले. शुक्रवारी दुपारी साहेबी बहादूर हे राजूर येथे घरी आले असता, घरामागील दरवाजा खुला होता. तसेच लोखंडी कपाट उघडे दिसून आले. घरातील इतर साहित्यही अस्ताव्यस्त पडून होते. चोरट्यांनी कपाटातील ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, १३ ग्रॅमचे सोन्याचे मणी, चांदीची सीता व नगदी ११ हजार रुपये, असा एकूण ४९ हजार ६५० रुपयांचा मुदेमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक टीपुरने करीत आहेत.

Web Title: Burglary at Rajur Colony