शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भूमाफियांचा घाटंजीच्या शिक्षकाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:47 IST

भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे आले आहे.

ठळक मुद्देएकाच भूखंडावर दोन बँकांमधून सात कोटींच्या कर्जाची उचल

पांढरकवडा चौफुलीवरील २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपलालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर हा एकच भूखंड दोन बँकांमध्ये तारण ठेऊन त्यावर सहा कोटी ८० लाख रुपयांच्या कर्जाची उचलही केली गेली.शिक्षकाचा भूखंड हडपणारा हा भूमाफिया बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदार आहे. त्याला सत्ताधारी भाजपाचा भक्कम आशीर्वाद आहे. त्याची शहरात कोट्यवधींची बांधकामे सुरू आहेत. सदर कंत्राटदार गेल्या पाच दिवसांपासून घरापासून दूर आहे. त्याच्या विरोधात राजकीय आशीर्वादामुळे पोलीस रेकॉर्डवर अद्याप काहीही नोंदविले गेले नसले तरी त्याच्या शोधार्थ पोलीस जीप दोन वेळा त्याच्या घरी जाऊन आल्याचे सांगितले जाते.घाटंजीतील शिक्षकाने काही वर्षांपूर्वी पांढरकवडा चौफुलीवर २० हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी केला. परंतु लतेश नामक कंत्राटदाराने परस्परच हा भूखंड स्वत:च्या नावावर करून घेतला. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात स्वत:ची कोणतीही मालकी नसलेल्या या एकाच भूखंडावर यवतमाळातील एका बँकेकडून साडेचार कोटी तर दुसऱ्या बँकेकडून दोन कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. ‘लोकमत’ने भूमाफियांच्या कारनाम्यांचा भंडाफोड केल्यानंतर लतेशचा कारनामाही उघड झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सदर शिक्षकाकडे तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळेच सदर शिक्षक सध्या तरी गप्प असल्याचे बोलले जाते.लतेशने असे आणखी काही भूखंड हडपले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावरील कर्जाचा आकडा १७ ते १९ कोटींच्या घरात असल्याचेही सांगण्यात येते.म्हणे, एसआयटी ‘ताटा खालचे मांजर’ !शिक्षकाचा हडपलेला भूखंड व त्यावरील सहा कोटी ८० लाखांचे कर्ज प्रकरणानिमित्ताने लतेशचे नाव पुढे आले. लतेश हा पैसा शहरातील ‘रानो व बंटी’ या प्रमुख दोन क्रिकेट बुकींगकडे हरला. पोलिसांचे हात या बुकींपर्यंत पोहोचू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात हे दोन्ही बुकी पोलिसांना जुमानत नाहीत. एवढेच नव्हे तर भूखंड घोटाळ्याच्या तपासासाठी यवतमाळचे एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेली एसआयटी (पोलिसांचे विशेष तपास पथक) तर आमच्या ‘ताटा खालचे मांजर’ असल्याच्या वल्गना हे बुकी करीत असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी कोण पोलीस अधिकारी किती तास आमच्या ‘बैठकीत’ असतो, याचा लेखाजोखाही ते खासगीत उघड करतात. बुकींची ही वल्गना थेट अमरावतीपर्यंत पोहोचल्याने आता भूखंड माफियांच्या या तपासावर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचेही लक्ष राहणार आहे. त्यांच्या स्तरावरूनही चौकशीचे डे-टू-डे अपडेट घेतले जाणार असल्याचे सांगितले जाते.बँकांतील कर्जाचा पैसा क्रिकेट सट्ट्यातलतेश हा क्रिकेट सट्ट्याचा शौकिन होता. तीन वर्षापूर्वी त्याला एका धाडीत अटकही करण्यात आली होती. या क्रिकेट सट्ट्यात पैसा हरल्यानेच त्याने भूखंड हडपणे व त्यावर कर्ज उचलण्याचे प्रताप सुरू केले. शिक्षकाच्या भूखंडावर उचललेले कोट्यवधींचे कर्जसुद्धा या क्रिकेट सट्ट्यातच लावले गेल्याची माहिती आहे. ‘रानो व बंटी’ हे यवतमाळातील प्रमुख क्रिकेट बुकी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे हा बहूतांश पैसा गेल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस