दोन गटांत तुंबळ हाणामारी

By Admin | Updated: July 15, 2015 03:02 IST2015-07-15T03:02:06+5:302015-07-15T03:02:06+5:30

लहान मुलांच्या भांडणावरून वाद होऊन दोन गटांत लाठी काठी व लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली.

Bumpy trumpets in two groups | दोन गटांत तुंबळ हाणामारी

दोन गटांत तुंबळ हाणामारी

मुलांच्या भांडणातून वाद : २२ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
पुसद : लहान मुलांच्या भांडणावरून वाद होऊन दोन गटांत लाठी काठी व लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडील पाच ते सहा जण जखमी झाले. तर दोन्हीकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील आंबेडकर वॉर्ड व नवीन पुसद परिसरात घडली.
या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून देण्यात आल्या असून दोन्हीकडील तब्बल २२ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी लक्ष्मी राजू कवडे (३७ रा. नवीन पुसद) यांच्या लहान मुलासोबत दुसऱ्या गटातील (आंबेडकर वॉर्ड) लहान मुलाचे भांडण झाले. या किरकोळ घटनेनंतर फिर्यादी लक्ष्मी कवडे यांच्या घरी आलेला पाहुणा पिंटू श्रीरामे हा चौकातील दुकानात पुडी खाण्याकरिता गेला असता आरोपी दौलत हाडसे, भीमा तुकाराम हाटे, छोटू तुकाराम हाटे, आकाश सावळे, अमोल सावळे, मुन्ना हाटे (सर्व रा. आंबेडकर वॉर्ड पुसद) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पिंटू श्रीरामे व रवी दिंडे यांना लाभा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच रवी दिंडे यास जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मी राजू कवडे यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
तर याच प्रकरणात फिर्यादी आकाश सुधाकर सावळे (२६ रा. आंबेडकर वॉर्ड पुसद) हा मित्रासोबत हनुमान मंदिराच्या ओट्यावर बसले असता आरोपी राजू कवडे, त्याचा भाचा पिंटू श्रीरामे, देवीदास शिंदे, धनंजय पांढरे, विनोद कवडे, गणेश शिंदे, मारोती शिंदे, लल्ला दिंडे, प्रमोद दिंडे, रमेश लोंढे, महेश बेरगड, गजानन शिंदे, विनोद शिंदे, अमोल पांढरे, दिनेश पांढरे, आकाश शिंदे (सर्व रा. नवीन पुसद) आदींनी जातीवाचक शिवीगाळ करून लाठी काठीने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी आकाश सावळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सर्व १६ आरोपींविरुद्ध विविध कलमांसह अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले. घटनेच्या वेळी दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पुसद शहरचे ठाणेदार धनंजय जगदाळे, एपीआय धीरज चव्हाण, एपीआय क्षीरसागर हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गटांतील नागरिकांना शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी आंबेडकर वॉर्ड व नवीन पुसद या दोन्ही परिसरात प्रचंड तणाव होता. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. आज दारव्हा येथील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. (प्रतिनिधी)
दगडफेकीने वाढला तणाव
लहान मुलांच्या भांडणातून आंबेडकर वॉर्ड व नवीन पुसदमधील काही नागरिकांचा वाद पेटला. वाद सुरू असताना दोन्हीकडून दगडफेक करण्यात आल्याने तणाव आणखी वाढला. त्यामुळेच दंगल आणि अ‍ॅट्रोसिटीसारखे गंभीर गुन्हे या प्रकरणात दाखल करण्यात आले.

Web Title: Bumpy trumpets in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.